महाविकास आघाडी सत्तेवर आल्यावर जातनिहाय जनगणना करून 50 % आरक्षण मर्यादा वाढवणार - एडवोकेट सदाशिव भाऊ पाटील
आटपाडी kd24news :महाविकास आघाडी सत्तेवर आल्यानंतर जातनिहाय जनगणना करून 50 % आरक्षण मर्यादा वाढवणार. महाविकास आघाडीने पंचसूत्री जाहीर केली आहे. महालक्ष्मी योजनेअंतर्गत महिन्याला 3 हजार रुपये, गरीब कुटुंबातील लोकांना पंचवीस लाखाचा विमा हॉस्पिटल मधील 20 लाख बिल झाले तरी एक रुपया भरावा लागणार नाही त्याच्या विमा खात्यातून पैसे मिळणार,सुशिक्षित बेरोजगारांना 4 हजार भत्ता, महिलांना बस सेवा मोफत, कृषी समृद्धी अंतर्गत तीन लाखापर्यंत कर्ज माफ,वर्षाला 6 सिलेंडर मोफत देणार त्यामुळे सर्वांनी महाविकास आघाडीच्या पाठीशी राहावे असे आव्हान माजी आमदार सदाशिव भाऊ पाटील यांनी केले.
भवानीमाळ, मायाक्का नगर, चंद्रसेन नगर आणि आंबेडकर नगर येथील महाविकास आघाडीचे उमेदवार वैभव दादा पाटील यांच्या प्रचार सभेत केले.
पाटील पुढे म्हणाले की, शेतकरी कामगार, महिला हे सर्वसामान्य जनतेचे सर्व प्रश्न महाविकास आघाडी सरकार सोडू शकते. ही स्वाभिमानाची लढाई आहे. आपल्या सर्वांचा हक्काचं सरकार आणण्यासाठी आपण प्रयत्न करायचे आहेत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार साहेब पक्षाचा स्ट्राईक रेट अधिक आला तर आपल्या सांगली जिल्ह्याला महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याची संधी जयंत पाटील साहेबांच्या रूपाने प्राप्त होणार आहे आणि मग आचारीही आपला आणि वाढपी आपला असेल तर आपल्या ताटामध्ये अधिकच प्राप्त होईल. की जेणेकरून आपल्या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपण अधिकचा निधी प्राप्त करू शकतो. त्यासाठी महाविकास आघाडीला मतदान करणे गरजेचे आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार माननीय वैभव दादा पाटील यांच्या नावासमोरील तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हा समोरील बटन दाबून प्रचंड मताने विजयी करावे.
यावेळी अशोक दाभोळे गुरुजी, गोकुळा पाटील, दिनकर साठे, नगरसेवक एडवोकेट विजय जाधव, बाळासाहेब पवार, अमित पवार, अजित साबळे,भरत कांबळे यांनी मनोगते व्यक्त केली.
या कार्यक्रमाला नगरसेवक फिरोज तांबोळी ,नगरसेवक प्रशांत कांबळे, भीमराव पवार, राम रतन पाटील, हनुमंत पवार, गणेश पाटील,अर्जुन पवार, पांडुरंग चोथे, उमेश बुधावले, सतीश पाटील, शंकर पवार,जगदीश पाटील, अशोक शितोळे, शालन पवार, हौसाताई पवार, मधुकर पाटील, बाबुराव मिस्त्री, संतोष पाटील ज्योती नानांची नातू , महादेव रोकडे, सुरज कांबळे, हरिबा साळुंखे,दत्ता साठे, बापू उजगरे, सुरेश जाधव, पांडुरंग जाधव, राजाराम जाधव, गणपती फडतडे,दत्ता कांबळे,भीमदेव राठोड, शंकर सूर्यवंशी आदी मान्यवर कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते आभार एडवोकेट तानाजी जाधव यांनी मांडले.