महाराष्ट्र राज्य भटक्या विमुक्त जाती संघटनेचा महाविकास आघाडी शरदचंद्र पवार साहेब पक्षाला जाहीर पाठिंबा
आटपाडी kd24news :महाराष्ट्र राज्य भटक्या विमुक्त जाती संघटनेचा महाविकास आघाडी शरदचंद्र पवार साहेब पक्षाला जाहीर पाठिंबा देण्यात आला. या संघटनेचे अध्यक्ष उपराकार लक्ष्मण माने यांच्या 75 पूर्ण झाली. ते माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्याबरोबर 50 वर्ष काम करत आहेत. श्री माने यांच्या वाढदिवसानिमित्त जमा झालेला निधी प्रतिगामी शक्तीचा पराभव करण्यासाठी पक्षाला कडे सुपूर्द केला.
राष्ट्रवादी शरद चंद्र पवार साहेब यांचा पक्ष फुटल्यानंतर या आणीबाणीच्या संकटकाळी महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या पाठीशी ठामपणे राहण्यासाठी खानापूर मतदार संघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार माननीय वैभव दादा पाटील यांना महाराष्ट्र राज्य भटक्या विमुक्त जाती संघटनेने जाहीर पाठिंबा दिला.
संघटनेचे अध्यक्ष उपराकार लक्ष्मण माने, सरचिटणीस नारायण जावलीकर व सर्व पदाधिकारी यांनी पाठिंब्याचे पत्र महाविकास आघाडीचे उमेदवार माननीय वैभव दादा पाटील यांना दिले.