Sanvad News आटपाडी तालुक्यात वैभव पाटील यांचे जंगी स्वागत

आटपाडी तालुक्यात वैभव पाटील यांचे जंगी स्वागत

Admin

 आटपाडी तालुक्यात वैभव पाटील यांचे जंगी स्वागत


            आटपाडी kdnews:आटपाडी तालुक्यात वैभव पाटील यांचे जंगी स्वागत करीत त्यांचा विजय पक्का असल्याचा दावा देत आहेत.

           खानापूर आटपाडी विसापूर सर्कल चे विधानसभेचे महाविकास आघाडीचे शरदचंद्र पवार साहेब गटाचे अधिकृत उमेदवार वैभव सदाशिवराव पाटील यांनी गेले दोन दिवस आटपाडी तालुक्यात गाव निहाय दौरा सुरू केला आहे यावेळी वैभव पाटलांना लोक डोक्यावर घेऊन गावच्या वेशीतून वाजत गाजत स्वागत करत आहेत

      तळेवाडी पात्रेवाडी माळेवाडी शेटफळे येथे ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहाने दादांचे स्वागत केले. ही परिवर्तनाची लाट असल्याचे जाणवत आहे.दरम्यान दादांची तुतारी आटपाडी तालुक्यात घुमणारच असा नारा दिला जात आहे. यावेळी तळेवाडी चे माजी सरपंच शरद म्हारगुडे यंदा वैभव दादांना आम्ही खांद्यावर नक्कीच घेणार आहे कुणी कितीही लावावी ताकद तरी सर्वसामान्य जनता ही वैभव दादांच्या पाठीमागे ठामपणे उभे आहे 

        यावेळी नामदेव शेठ सरगर, लक्ष्मण सरगर, विजय सरगर, भगवान म्हारगुडे, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते तर पात्रेवाडी येथे अजय गायकवाड यांनी नेता आणि कार्यकर्ता यांची नाळ पाटील कुटुंबाने आजपर्यंत तीन पिढ्या राखली आहे त्यामुळे याची उतराई आम्ही भरघोस मतदानाच्या माध्यमातून नक्की करणार आहे.                                      माळेवाडी गावातील गणपत साळुंखे, लालासो जाधव,प्रकाश गायकवाड,रामदास पवार, यांनी यावेळी भाऊ चे जुने सहकारी दादा यावेळी तुमच्या बरोबर आहेत त्यामुळे आपला विजय निश्चित झाला आहे माळेवाडीकर एका छत्राखाली आलो आहोत म्हणजे परिवर्तन नक्कीच घडेल अशी ग्वाही दिली महाराष्ट्रात यावेळी नक्कीच बदल घडतोय आणि आटपाडी तालुक्यात आम्ही सुध्दा बदल घडवून दाखवू यावेळी वैभव दादांनी माझी उमेदवारी का आहे आणि आटपाडी तालुक्यांची परिस्थिती यांवर बोलताना विरोधकांना टोले लावले कारण एक जण पैरा फेडण्यासाठी आणि तालुक्यांची अस्मिता जपण्यासाठी निवडणुक लढवत आहेत असा भास करत आहेत तर दुसरे वडीलांच्या सहानुभूतीवर आणि गद्दारी करून मिळवलेल्या खोक्यावर नेते विकत घेऊन निवडणुकीत उतरले आहेत कोणतंही व्हीजन नाही यांच्याकडे गेली दहा वर्षे सलगपणे सत्तेत असूनही माझ्या युवक युवतींच्या हाताला रोजगार निर्मिती व्हावी यासाठी शुन्य कर्तबगारी असलेली लोक एकत्र येऊन  दहशत निर्माण करुन मतदान मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत

        आटपाडी तालुक्यातील जनतेला दीड आमदारांच्या माध्यमातून काम करावे लागते अर्धी आमदार आटपाडी तालुक्यात कामकाज पाहतोय तर एक आमदार राहिलेल्या मतदारसंघात असतो थेट जनसंपर्क करून लोकांना विधायक काम करता येत नाही. नंदीला नमस्कार केल्याशिवाय शंकर पावत नाही ही वस्तुस्थिती आहे ही पध्दत मोडून काढण्यासाठी मी मैदानात आहे.

              आमदार किती स्वस्त आणि मस्त असतो हे आटपाडी करांना दाखवून देणार विरोधक विश्वासक गोष्टी बद्दल बोलत नाहीत मी विकासासाठी मत मागतोय मी आटपाडी तालुक्याचा स्वाभिमान जपण्यासाठी मत मागतोय कुणाला थांबवण्यासाठी नाही तर कुणाची जिरवण्यासाठी नाही भविष्याचा वेध घेऊन मला परिसरातील विद्यार्थ्यांना अद्यावत व दर्जेदार शिक्षण मिळवून देण्यासाठी शौक्षणिक संकूलाची निर्मिती करून रोजगार निर्मिती व्हावी यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहणार आहे बाळेवाडी येथे नजीकच्या काळात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावे शौक्षणिक संकूलाची निर्मिती करून बाळेवाडी बरोबर आटपाडीचे नाव महाराष्ट्रात पोचवून दाखवतो फक्त आपण साथ द्या मी जिंकण्यासाठी च लढतोय कारण आटपाडी तालुक्यांचे राजकारण मराठी चित्रपट सृष्टीतील निळू फुले च्या राजकारणा सारखे सुरू आहे सोबत आला तर नाहीतर त्रास देऊन दहशत माजवून द्वेषाचे राजकरण करत आहेत.

        ज्यांनी संस्था बंद पाडल्या त्यावर कोणी बोलत नाहीत उलट माझ्या संस्थेवर व कर्मचारी यांच्या वर टिका टिप्पणी करतात स्वत:ची निष्क्रियता लपवण्यासाठी विरोधक आमच्यावर टीका करत आहेत परंतु लोक हुशार आहेत त्यांना त्यांची जागा मतदानातून नक्कीच दाखवून देतील आम्ही मतदार संघाच्या चौफेर विकासासाठी कटिबंध आहोत.

             शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळाला पाहिजे शेतीपूरक व्यवसाय अधिक अधिक प्रमाणात उभारून शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहणार आहे म्हणून आपलं बहुमूल्य मत देऊन मला आशिर्वादीत करावे यावेळी गावातील युवक ज्येष्ठ नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते

To Top