Sanvad News सुहास बाबर यांचा परराज्य व परगावच्या मतदारांशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद

सुहास बाबर यांचा परराज्य व परगावच्या मतदारांशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद

Admin

 सुहास बाबर यांचा परराज्य व परगावच्या

मतदारांशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद 



मतदानाला येण्याचे केले आवाहन 



आटपाडी kdnews संपादक :खानापूर आटपाडी विसापूर विधानसभा मतदारसंघातील माहितीचे अधिकृत उमेदवार सुहास बाबर यांनी आता हायटेक प्रचाराला सुरुवात केली आहे . मतदारसंघाच्या बाहेरील परराज्यात असणाऱ्या तसेच परगावी असणाऱ्या व्यावसायिकांशी, मतदार बांधवांशी ते व्हिडिओ कॉल द्वारे संवाद साधत आहेत या हायटेक प्रचार कार्यात देखील त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

     यामध्ये छत्रपती संभाजीनगर येथे स्थित असणारे खानापूर आटपाडी विसापुर सर्कल मधील गलाई बांधवांनी एकत्रित येऊन महायुतीचे उमेदवार सुहासभैय्या बाबर यांना पाठिंबा दिला. बैठक सुरू असताना सुहासभैय्यानी व्हिडीओ कॉल वरून सर्वांशी संवाद साधला, आजपर्यंत स्व. अनिलभाऊंनी आमच्यासाठी खूप केलेलं आहे, गावी पाणी आल्यामुळे आम्ही आता निश्चित आहोत, भाऊंची परतफेड करण्याची जबाबदारी आता आमची असून सुहासभैय्या तुम्ही भरघोस मतानी विजयी होणारच याची आम्हाला खात्री असल्याचे गलाई बांधवांनी सांगितले.



   दिल्ली येथे स्थित असणारे खानापूर आटपाडी विसापुर सर्कल मधील गलाई बांधवांनी एकत्रित येऊन महायुतीचे उमेदवार सुहासभैय्या बाबर यांना पाठिंबा दिला आहे तिथेही बैठक सुरू असताना सुहासभैय्यानी व्हिडीओ कॉल वरून सर्वांशी संवाद साधला, 

आम्ही आजपर्यंत स्व. अनिलभाऊंच्या सोबत होतो तसेच ईथुनपुढे तुमच्या सोबत ठामपणे राहू अशी ग्वाही सर्वांनी दिली, लवकरच आम्ही सर्वजण गावी येत असून धनुष्यबाण घरोघरी पोहोचण्यास आम्ही मदत करू असे बांधवांनी सांगितले.



     पुणे येथे स्थित असलेल्या खानापूर मतदासंघांतील मतदारांनी एकत्रित येऊन पुणे मधील बाबर प्रेमी आहेत हे दाखवून दिले, या वेळी सुहास बाबर यांनी व्हिडीओ कॉल वरून सर्व जमलेल्या सर्वांनी २० तारखेला गावाकडे येऊन मतदान धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मतांनी निवडून द्यावं असे आवाहन त्यांनी केले . यावेळी दिलीप (आण्णा) व कळंबी गावातील मान्यवर उपस्थित होते.

To Top