Sanvad News आटपाडी तालुक्यातील वाड्या वस्तीवर चुरशीचे मतदान

आटपाडी तालुक्यातील वाड्या वस्तीवर चुरशीचे मतदान

Admin

 आटपाडी तालुक्यातील वाड्या वस्तीवर चुरशीचे मतदान 



आटपाडी : खानापूर विधानसभा मतदार संघ २८६ मध्ये मतदान प्रक्रिया सकाळ पासुन सुरु आहे. सकाळी ७.०० ते ०५ वाजेपर्यंत ६२. ०३ टक्के मतदान झाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिली.


२८६ खानापूर विधानसभा मतदार संघामध्ये एकूण ३५०९९६ मतदार आहेत. यामध्ये पुरुष -१७७५४२,असून आणि महिला १७३४३५ मतदार आहेत यामध्ये इतर १४ मतदार आहेत. सकाळ पासुन झालेल्या ७.०० ते ०५ च्या दरम्यान एकूण २१७७३० मतदारांनी आपला मतदान करुन हक्क बजावला आहे. यामध्ये पुरुष १७७५४२,व महिला १०९००९ आणि इतर ७ असे एकूण २१७७३० मतदारांनी आपला मतदाना हक्क बजावला आहे.मतदार संघातील एकूण मतदान सायंकाळी ०५ पर्यन्त ६२.०३ टक्के झाले आहे.


२८६ खानापुर विधानसभा मतदार संघात, महायुती कडून सुहासभैय्या अनिल बाबर, महाविकास आघाडी कडून वैभव सदाशिवराव पाटील तर माजी आमदार राजेंद्र आण्णा देशमुख हे अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात आहेत. तीनही उमेदवार तुल्यबळ असल्याने, या ठिकाणी निवडणीत मोठी रंगत आली आहे.आटपाडी येथील पाटीलमळा, पांढरेवाडी बूथ येथे चुरशीचे मतदान झाले आहे.... पांढरेवाडी बूथ क्रमांक ३३७ येथे एकूण मतदान ९४२ पैकी ६७४ झाले व पोस्टल ७ एकूण ६८० झाले.व पाटिलमळा बूथ क्रमांक ३३६ मध्ये एकूण ५७९ पैकी ४३८ झाले व पोस्टल ७ एकूण ४४५ झाले आहे. यामध्ये पाटील मला बूथ येथे धनुष्यबाण तर पांढरेवाडी बूथला ऑटो रिक्षा वरचढ असे असल्याचे मतदार, कार्यकर्ते यांचे कडून बोलले जात आहे.याचं बराबर आवळाई बुथ नंबर २९६ एकुन १०८९ पैकी ७६० मतदान झाले. व बुथ नंबर २९५ मधुन एकुन मतदार ११०३ पैकी ७२५ मतदान झाले.

प्रत्येक उमेदवाराचे कार्यकर्ते नागरिकांना मतदान करण्यासाठी आणत असल्याचे चित्र दिसत होते.

To Top