Sanvad News समग्र शिक्षा अभियान व लोणारे दादरे गुरुकुल विद्यालय आटपाडी यांची संयुक्तपणे मतदान जनजागृती रॅली

समग्र शिक्षा अभियान व लोणारे दादरे गुरुकुल विद्यालय आटपाडी यांची संयुक्तपणे मतदान जनजागृती रॅली

Admin

 समग्र शिक्षा अभियान व लोणारे दादरे गुरुकुल विद्यालय आटपाडी यांची संयुक्तपणे मतदान जनजागृती रॅली



 

गुरूकुलच्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी रॅली व पोस्टरच्या माध्यमातून केले मतदानाचे आवाहन 


व्हिडीओ पहा 👆🏻

आटपाडी संपादक kdnews:आटपाडी येथील समग्र शिक्षा अभियान पंचायत समिती आटपाडी व लोणारी समाज सेवा संघ मुंबई संचलित श्री विष्णुपंत रामचंद्र लोणारी दादरे, गुरुकुल माध्यमिक व उच्च माध्यमिक विज्ञान विद्यालय मापटे मळा आटपाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने संपूर्ण गावातून सोमवारी दि.११ रोजी मतदान जनजागृती रॅली काढण्यात आली. यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी ‘मतदार राजा जागा हो 'लोकशाहीचा धागा हो, आला लोकशाहीचा सण साजरा करू आनंदान,निर्भय बनू सगळे चला करूया मतदान,बोटावरील एक थेंब शाही बनवेल बळकट लोकशाही,यासारख्या घोषणा देत मतदान जागृती केली व या राष्ट्रीय कामात आपला महत्वपूर्ण सहभाग नोंदवला.यावेळी आपल्या पाल्यांचे मतदान जनजागृती रॅली बघून पालकांनी २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत शंभर टक्के मतदान करण्याचा संकल्प केला.यावेळी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी श्री. जगन्नाथ कोळपे,सहाय्यक गटविकास अधिकारी श्री.खरात साहेब, समग्र शिक्षा अभियानाचे अधिकारी श्री.प्रशांत चंदनशिवे , श्री.श्रीरंग वायदंडे,आटपाडी पोलीस प्रशासन, तसेच गुरुकुल विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.पोपट साळुंखे, सर्व शिक्षक -शिक्षिका स्टाफ व विद्यार्थी- विद्यार्थीनी उपस्थित होते.

To Top