Sanvad News विसापूर सर्कल मध्ये शांतता आहे म्हणजे जास्त मोठ्या मताचा पाठिंबा जनतेच्या मनामध्ये....! - राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब.

विसापूर सर्कल मध्ये शांतता आहे म्हणजे जास्त मोठ्या मताचा पाठिंबा जनतेच्या मनामध्ये....! - राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब.

Admin

 विसापूर सर्कल मध्ये शांतता आहे म्हणजे जास्त मोठ्या मताचा पाठिंबा जनतेच्या मनामध्ये....! - राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब.




              विसापूर सर्कल मध्ये शांतता आहे म्हणजे जास्त मोठ्या मताचा पाठिंबा जनतेच्या मनामध्ये आहे. या भागाचे स्वर्गीय आर.आर.आबा पाटील आमदार,मंत्री, उपमुख्यमंत्री होते. आर आर आबा आज हयात असते तर या संकटाच्या वेळी शरदचंद्र पवार साहेबांना यांना मोठी ताकद दिली असती. त्यांनी पवार साहेबांची साथ सोडली नसती. मी मतदारांना आवाहन करतो स्थानिक काही गोष्टी असल्या तरी त्या बाजूला ठेवून शरदचंद्र पवार साहेबांच्या साठी मागविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार माननीय वैभव दादा पाटील यांच्या पाठीशी ताकद उभी केली पाहिजे आणि ती करावी असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब यांनी केले.

           विसापूर येथील माविकास आघाडीचे उमेदवार मान्य वैभव दादा पाटील यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत ते बोलत होते.

        



  पाटील साहेब पुढे म्हणाले की, खानापूर मतदारसंघासाठी नवीन चेहरा माननीय वैभव पाटील यांच्या रूपाने दिला आहे. त्यांनी विटा नगरपालिकेमध्ये उत्कृष्ट काम करून प्रशासनाचा चांगला अनुभव असणारा कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे. सदाशिव भाऊ सारख्या ज्येष्ठ नेत्यांनी या मतदार संघाच्या निवडणुका लढवल्या मतदारसंघाचा विकास केला. आता त्यांनी सांगितलं आपण नव्या पिढीला संधी देऊया म्हणून आम्ही वैभव दादा पाटील हा नवीन चेहरा दिला आहे. लोकांनी आता त्यांना साथ द्यायला सुरुवात केली आहे.

         तिकीट मागायला आल्यानंतर सर्वांनी सांगितले आमच्यापैकी कोणालाही द्या आणि तिकीट दिल्यानंतर काहीजण गेले. ही लढाई स्वाभिमानाची आहे. पक्ष अडचणीत असल्याने सर्वांनी महविकास आघाडी सोबत राहावे. उद्योग प्रचंड प्रमाणात महाराष्ट्राच्या बाहेर गेले आहेत. तरुणांना नोकऱ्या नाहीत. महागाई झाली त्याच्यावरती जीएसटी कर आपला काही पिच्छा सोडत नाही. महाराष्ट्र मध्ये आया बहिणींची अनेक वेळाअब्रू घेण्याचे पाप अनेक लोक करतात आणि आणि हे सतत घडतात आणि राज्य सरकारला कायदा आणि सुव्यवस्था राखता आली नाही. अशा अनेक गोष्टी सांगू शकतो. हे सांगत असताना या मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार का निवडून आणावा यासाठी महाविकास आघाडीने 5 महत्वाचे मुद्दे महाविकास आघाडीने जाहीर केलेले आहेत. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार येईल ही काळ्या दगडावरील पांढरी रेघ आहे. महाराष्ट्रभर फिरून आल्यानंतर आम्हाला विश्वास आहे. 

             

मोदी पासून ते एकनाथ शिंदे पर्यंत यांनी दिलेली आश्वासने खोटी फसवी आहेत राहुल गांधी यांनी दिलेली आश्वासने कर्नाटकात महिलांना दोन हजार रुपये मिळतात. तेलंगणात दिलेल्या आश्वासनाची अंमलबजावणी सुरू आहे. मोदी साहेबांनी दिलेली आश्वासने खरी ठरत नाहीत आश्वासने  

 फलद्रूप होत नाहीत.हे तुम्हाला ज्वलंत उदाहरण देऊन सांगितले. महाराष्ट्रातील गरीब कुटुंब आहेत की जे हॉस्पिटलचे बिल देऊ शकत नाहीत. त्या गरीब कुटुंबातील लोकांचा 25 लाख रुपये चा विमा काढायचा निर्णय करेल. पुण्याचा रुबी किंवा मुंबईच्या ब्रिज कँडी मध्ये वीस लाख बिल झाले तरी कार्ड दाखवल्यानंतर त्यांच्या विमा खात्यातून पैसे मिळतील एक रुपयाची सुद्धा तोशिष त्यांना लागणार नाही. तरी सर्वांनी महाविकास आघाडीचे उमेदवार वैभव दादा पाटील यांना ताकद द्यावी.

       

     स्वागत प्रास्ताविकात प्रकाश माने म्हणाले, यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राचा मंगल कलश आणला. राजकारणाबरोबर सामाजिक सर्वांगीण विकास स्वर्गीय वसंत दादा पाटील, स्वर्गीय राजारामबापू पाटील, शरदचंद्रजी पवार साहेब, ज्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नाला वाचा फोडली ते एस एम जोशी, वी. स.पागे, कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यासारखे तडफदार विरोधी पक्ष नेते होते. आत्ताचे राजकारणी जाती- पातीत भांडणे लावत आहेत. शरदचंद्र पवार साहेब यांच्या स्वप्नातला महाराष्ट्र घडवायचा आहे त्यासाठी महाविकास आघाडीच्या पाठीशी ठामपणे रहा.

       



 यावेळी माजी आमदार सदाशिव भाऊ पाटील,अवधूत ठोंबरे,महेश खराडे, निलेश कराळे,पदवीधर आमदार अरुण अण्णा लाड यांनी भाषणे केली. 

     या कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते शंकर दादा पाटील, अविनाश पाटील काका, अडवोकेट बाबासाहेब मुळीक, बाळासाहेब पाटील,आटपाडीचे रावसाहेब पाटील, हणमंतराव देशमुख, पैलवान चंद्रहार पाटील, नितेश कराळे,तुरची चे संजय पाटील, हायुम सावन्नुरकर, महेश खराडे, प्रमोद अमृतसागर, बोरगावचे संग्राम पाटील, विलास पाटील, संतोष जाधव, प्रकाश खुजट, मुकुंद ठोंबरे, राजू जानकर, प्रकाश माने, सिद्धनाथ जाधव,मनोज चव्हाण, महेश फडतरे, नितीनराजे जाधव,सतीश पाटील, जितेंद्र पाटील आदी मान्यवर कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. आभार चंद्रकांत दादा पाटील यांनी मानले.

To Top