आंबेबनमळा येथे महायुतीचे उमेदवार सुहासभैया बाबर यांचे जोरदार स्वागत, सुहासभैयानां आटपाडी शहरातून मताधिक्य देणार: वसंत हाके
आटपाडी :आटपाडी तालुका प्रचारदौऱ्या दरम्यान आंबेबनमळा येथे महायुती शिवसेना गटाचे अधिकृत उमेदवार मा.सुहासभेंया बाबर यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.यावेळी मा.सुहास बाबर यांनी उपस्थिती सर्व ग्रामस्थांशी संवाद साधतं गावातील आडीअडचणी जाणून घेतल्या,आटपाडी खानापूर व विसापूरसर्कल च्या प्रगतीचा विकासासाठी नेहमी प्रयत्नशील राहुन तालुक्यातील सर्व विकास कामे भाऊच्या पावलावर पाऊल टाकून कामे करणे चालू आहे. आणि येणाऱ्या काळात याहून जास्त गावच्या विकासासाठी प्रयत्न करण्यासाठी नेहमी वचनबद्ध आहे.पुढे म्हणाले की आटपाडी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी येणाऱ्या २० तारखेला धनुष्यबाण या चिन्हा समोरील बटण दाबून जास्तीत जास्त मतदान करून आशीर्वाद द्यावेत. यावेळी स्व:आमदार अनिलभाऊ बाबर यांचे जुने सहकारी, पधादिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ बंधू भगिनी मोठया संख्येने उपस्थितीत होते.
याप्रसंगी सांगली जिल्हा बँकेचे संचालक मा.तानाजीराव पाटील,दत्तात्रय पाटील (पंच),ऍंड.धनजय पाटील, RPI चे नेते राजेंद्र खरात,साहेबराव पाटील,वृषाली पाटील, मनोज नांगरे पाटील, बापूसो मगर,वसंत हाके,प्रकाश बनसोडे,प्रमुख पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थिती होते.
आटपाडी शहराला व तालुक्यातील पाणीपुरवठा करणाऱ्या सर्व योजना भाजप सेना युतीच्या काळात झाल्या आहेत. स्वर्गिय आमदार अनिलभाऊ बाबर यांनी तर आटपाडी शहराच्या विकासासाठी मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या पश्चात सुहासभैया बाबर व अमोलदादा बाबर यांनीही आपल्या सरकारच्या माध्यमातून प्रचंड कामे केली आहेत,त्यासाठी आटपाडी शहरातून यावेळेस मा.सुहासभैया बाबर मताधिक्य देऊ असे अभिवचन वसंत हाके यांनी दिले
आटपाडी येथे महायुतीचे अधिकृत उमेदवार सुहास बाबर यांच्या प्रचारार्थ आयोजित प्रचारफेरीवेळी मा.वसंत हाके बोलत होते. यावेळी मळ्यातील ग्रामस्थ व माता-भगिनीं मोठया संख्येने उपस्थित होते.
स्वर्गीय आमदार अनिलभाऊ बाबर यांनी टेंभू योजनेच्या माध्यमातून आटपाडी तालुक्यातील सर्व गावे व शहराच्या शेतीला पाणी देण्याचा प्रयत्न केला.आटपाडी शहरातील अंतर्गत रस्ते,मुख्य पेठेतील रस्ता,आटपाडीतील साई मदिर ते साठेचौक रस्ता,उपजिल्हा रुग्णालय,गादीमा नाट्यगृह, सभामंडप या सारखी पायभूत सुविधासह अनेक कोट्यावधीचे कामे केली आहेत त्यामुळे आटपाडी तालुक्याचा आर्थिक स्तर उंचावण्याचा प्रयत्न केला आहे.शहरातील अनेक पायाभूत सुविधा देण्यात आपल्या सरकारच्या माध्यमातून अनिलभाऊंना यश आले.भविष्यात आपण मा.सुहासभैयांच्या रुपाने महायुतीचा आमदार विजयी करुन.त्यांच्या माध्यमातुन आटपाडी शहराचा कायापालट होईल.त्यामुळे महायुतीला साथ द्या आणि आटपाडी शहरातून जास्तीत जास्त मताधिक्य द्यावे. असे प्रतिपादन मा.वसंत हाके यांनी केले.
याप्रसंगी आंबेबनमळा येथील सर्व ग्रामस्थांनी मा.सुहासभैया बाबर यांना जास्तीत जास्त मताधिक्य देऊन आमदार करण्याचा निर्धार केला.