कराड चे ज्येष्ठ लेखक कवी डॉ विनायकराव जाधव साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष पद भूषविणार
आटपाडी kdnews :सातारा,मराठी साहित्य मंडळ या प्रख्यात संस्थेतर्फे सातारा जिल्ह्यामधील कोरेगाव शहरामध्ये आठवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन रविवर दिनांक २४ नोव्हेंबर २४ रोजी सकाळी दहा वाजता आयोजित केले आहे
या संमेलनाचे उद घटन नांदेड येथील ज्येष्ठ लेखक डॉ घनश्याम पांचाळ हे करणार असून कराड येथील ज्येष्ठ लेखक कवी डॉ विनायकराव जाधव संमेलनाचे अध्यक्षा पद भूषविणरे आहेत तर म सा म चे कोरेगाव तालुका अध्यक्ष, चित्रपट दिग्दर्शक अमोल भुजबळ हे स्वागताध्यक्ष पदी उपस्थित राहून सर्व मान्यवरांचे स्वागत करणार आहेत, नाशिक येथील ज्येष्ठ कवयित्री ललिता गवांदे, कोल्हापूर येथील ज्येष्ठ कवयित्री रेखा दीक्षित, मावळते अध्यक्ष कराड येथील ज्येष्ठ कवी सुरेश लोहार मुख्य अतिथी म्हणून तर महाराष्ट्राला सुपरिचित असलेले ज्येष्ठ साहित्यिक डॉ जयप्रकाश घुमटकर उर्फ कवी गोलघुमट हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत, हे विशेष होय
याच संमेलनाला सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शिवाजीराव महाडिक, रहिमतपूर चे प्राचार्य अनिल बोधे, मुंबई महानगर चे प्रदेश अध्यक्षा सिध्दार्थ कुलकर्णी , म्हसवड शहराचे अध्यक्ष महादेव सरतापेआदी मान्यवर सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत,
दुपारच्या सत्रातअभिजात मराठी भाषेची भविष्यातील दिशा आणि दशा यावर परिसंवाद होणार असून त्याचे अध्यक्ष पद अलिबाग रायगड येथील ज्येष्ठ लेखक राजेश थळकर उपस्थित राहणार असून कोल्हापूरच्या सुनंदा बागडे या प्रमुख वक्त्या आहेत
त्यानंतर होणाऱ्या राज्यस्तरीय काव्य संमेलनाचे अध्यक्ष पद कोल्हापूरच्या ज्येष्ठ कवयित्री प्राचार्य रेखा दीक्षित भूषविणार असून सिध्दार्थ कुलकर्णी हे प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करणार आहेत या निमित्ताने काव्य वाचन स्पर्धेसाठी येणाऱ्या प्रथम तीस कवींना स्पर्धेत भाग घेता येणार आहे नंतर आलेल्या कवींना स्पर्धेत भाग घेता येणार नाही मात्र कविता सादर करण्याची संधी मिळणार आहे हे विशेष होय
याच संमेलनामध्ये साहित्य मंडळातर्फे देण्यात येणार सर्वात मानाचा आणि अत्यंत प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले शैत्या भूषण पुरस्कार सातारचे ज्येष्ठ साहित्यिक डॉ आ ह साळुंखे यांना प्रदान करण्यात येणार आहे तसेच साडेचारशे ते पाचशे प्रस्तावांमधून फक्त सहा दर्जेदार लेखकांची निवड केली आहे त्यामध्ये सातारा चे सुनील जगन्नाथ जाधव यांना विद्या भूषण तर रहिमत पुर येथील विजय उषा शहाजी कदम यांची समाजभूषण पुरस्कारासाठी निवड झाली अहे वाई सातारा येथील संभाजी रामचंद्र लावांड याना गुराखी कथा संग्रहाला तर रहीमत पूर येथील किरण लक्ष्मण तोडकर सूर्यवंशी यांच्या संघर्षाच्या वाटेवर या कविता संग्रहाला तर सातारा येथील भारती भीमराव झिमरे यांच्या अभ्र निरभ्र या कविता संग्रहाला तसेच सुरेख सुरेश कुलकर्णी यांच्या गुंफण शब्दांची नात्यांची या कविता संग्रहाला राज्य स्तरीय साहित्य भूषण पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे हे विशेष होय
या संमेलनाचे आयोजन कोरेगाव तालुका अध्यक्ष अमोल भुजबळ यांनी केले असून तर संयोजन सातारा शहर अध्यक्ष कवयित्री प्रतिभा गजरमल यांनी केले आहे या संमेलनाचे सूत्र संचालन सुप्रसिद्ध निवेदिका चित्रा बाविस्कर या करणार आहेत
तरी साहित्यप्रेमी रसिक प्रेक्षकांनी, लेखकांनी, कवींनी याचा लाभ घ्यावा असे मराठी साहित्य मंडळाने काढलेल्या पत्रकात म्हटले आहे