Sanvad News वैभव पाटलांच्या गावनिहाय प्रचार दौऱ्यात आटपाडीची अख्खी गावेच्या गावे मताधिक्य देण्याच्या घोषणा करू लागली

वैभव पाटलांच्या गावनिहाय प्रचार दौऱ्यात आटपाडीची अख्खी गावेच्या गावे मताधिक्य देण्याच्या घोषणा करू लागली

Admin

 वैभव पाटलांच्या गावनिहाय प्रचार दौऱ्यात आटपाडीची अख्खी गावेच्या गावे मताधिक्य देण्याच्या घोषणा करू लागली



आटपाडी :kdnews संपादक :खानापूर आटपाडी विसापूर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार वैभव दादा सदाशिवराव पाटील यांचा आटपाडी तालुक्यात गाव निहाय दौरा सुरू आहे आज सकाळ सत्रात तडवळे बनपुरी बाळेवाडी गोमेवाडी हिवतड येथे वैभव पाटलांचे जंगी स्वागत करून आटपाडी तालुक्यांतून मताधिक्य मिळवून देण्यासाठी रक्ताचे पाणी करु असे अभिजीत भुते यांनी आपल्या मनोगतात मत व्यक्त केले तर जालिंदर कटरे यांनी आटपाडी तालुक्यात डाळिंब शेतीसाठी संशोधन केंद्र व प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी दादांनी प्रयत्न करावेत दादा आपण आमदार निश्चित झालेला आहात आपल्या माध्यमातून आटपाडी तालुक्याचा चौफेर विकास व्हावा हीच अपेक्षा आहे बाळेवाडीकरांनी यंदा परिवर्तन नक्कीच घडेल आणि महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर निश्चित येईल आणि वैभव दादा विधीमंडळातून बाळेवाडी नक्कीच निधी आणून विकास करतील तर या दौऱ्यात वैभव पाटलांनी माझी उमेदवारी कुणाला थांबवण्यासाठी नाही कुणाची जिरवण्यासाठी नसून मला आटपाडी तालुक्याचा कमाल विकास करायचा आहे.युवक युवतींच्या हाताला रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आहे मतदारसंघात औद्योगिकीकरणाचे जाळे निर्माण करण्यासाठी आहे शैक्षणिक आरोग्य सेवा उत्तमरीत्या सुरू करण्यासाठी मी लढत आहे.



 विरोधकांच्या कडे कोणतंही व्हीजन नाही टेंभू सहानुभूती आणि पन्नास खोकी यावरच हे निवडणूक लढवत आहेत यांनी किती लोकांना रोजगार निर्मिती करून दिली याउलट हे माझ्या संस्था आणि कर्मचाऱ्यांच्या वर टिका टिप्पणी करतात स्वतः शून्य कर्तबगारी असलेली संस्था बंद पाडून लोकं आपल्या वडीलांच्या नावांवर मते मागतात अशा लोकांना जनताच घरी बसवेल तर काहीजण आटपाडी ची अस्मिता आणि पैरा फेडण्याची भाषा करून निवडणुक लढवत आहेत परंतु वैभव पाटील आटपाडी तालुक्यातील जनतेच्या प्रत्येक मतांची किंमत ठेवून येणाऱ्या काळात या परिसराचे नंदनवन केल्या शिवाय राहणार नाही यावेळी विविध गावचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य विविध संस्था चे पदाधिकारी उपस्थित होते

To Top