शनिवारी मतमोजणी असल्यामुळे आटपाडीचा बाजार शुक्रवारी होणार
आटपाडी:विधानसभा निवडणुकीचे मतदान काल २० रोजी झाले आणि २३ रोजी मतमोजणी असल्याने शनिवार होणारा भाजी-पाला व सर्व आटपाडीचा आठवडा बाजार आणि शेळ्या-मेंढ्यांचा बाजार शुक्रवारी भरविण्यात येणार आहे.याबाबत आटपाडी नगरपंचायत व आटपाडी बाजार समितीने माहिती दिली आहे. तरी शनिवार ऐवजी शुक्रवारी आठवडा होणार आहे तरी बाजार शेतकरी, भाजीपाला व्यापारी, पशुपालक, जनावरांचे व्यापारी ग्राहकांनी शुक्रवारच्या आठवडा बाजारात सहभागी व्हावे,असे आवाहन आटपाडी नगरपंचायत व कृषी उत्पन्न बाजार समिती यांचे कडून करण्यात आले आहे.
विधानसभा निवडणुक काल बुधवारी मतदान झाले आहे. मतमोजणी शनिवारी होणार आहे.आटपाडीमध्ये शनिवारी दोन सर्वात मोठे आठवडा बाजार होत असतात.यामध्ये भाजीपाला,धान्य,यासारखा मोठा आठवडा बाजार पटांगण, शुक ओढा परिसरात भरतो.दुसरा शेळ्या- मेंढ्यांचा बाजार आटपाडी बाजार समितीच्या आवारात भरतो. शनिवारी मतोजणी असल्याने त्या दिवशी शेळ्या,मेंढ्यांसह नियमीत आठवडा बाजार रद्द करून तो शुक्रवारी भरवण्यात आला आहे. मतमोजणीमुळे झालेल्या या बदलाची माहिती देत लोकांनी शुक्रवारच्या बाजारात सहभागी होण्याचे आवाहन आटपाडी नगरपंचायत व कृषी उत्पन्न बाजार समिती कडून करण्यात आले आहे.