Sanvad News "युवा महाराष्ट्र साहित्य भूषण पुरस्कार २०२४ सोहळा संपन्न

"युवा महाराष्ट्र साहित्य भूषण पुरस्कार २०२४ सोहळा संपन्न

Admin

 "युवा महाराष्ट्र साहित्य भूषण पुरस्कार २०२४ सोहळा संपन्न 

 

डॉ जनार्दन भोसले यांना "युवा महाराष्ट्र साहित्य भूषण पुरस्कार २०२४ "प्रदान करताना प्रसिद्ध शिव व्याख्याते प्रा संपत गारगोटे व हरीश भाई देखणे व इतर मान्यवर

आटपाडी kd24news :पुणे युवा प्रबोधन साहित्य मंच महाराष्ट्र राज्य  यांच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात

न-हे ता हवेली येथील साहित्यिक, पत्रकार  डॉ जनार्दन भोसले  यांनी

शैक्षणिक,  , साहित्यिक सामाजिक  माध्यमातून समाज प्रबोधन व जनतेची सेवा या गोष्टी सामाज्याच्या हितासाठी महत्वपूर्ण ठरत आहेत क्षेत्रात उल्लेखनीय  कार्य कर्तृत्व या साठी  "युवा महाराष्ट्र साहित्य भूषण पुरस्कार २०२४ "  हा पुरस्कार दिला आहे असे युवा प्रबोधन साहित्य मंच चे संस्थापक अध्यक्ष सागर भाऊ वाघमारे यांनी या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले.


 युवा प्रबोधन साहित्य मंच, मावळ यांनी त्यांच्या द्वितीय वर्धापनदिन निमित्ताने डॉ जनार्दन भोसले यांना "युवा महाराष्ट्र साहित्य भूषण पुरस्कार शिव व्याख्याते प्रा संपत गारगोटे आणि हरिष भाई देखणे यांच्या हस्ते पुरस्कार प्रधान करण्यात आले.

सन्मान चिन्ह, सन्मान पत्र, सुवर्ण पदक असे स्वरूप होते

गौतमी पाटील, न्यू होम मिनिस्टर फेम क्रांती नाना मळेगावकार, नृत्यांगना काव्या मुंबई कर, अभिनेत्री आरोही हिवरकर,अध्यक्ष पिंकीताई वाघमारे,, रितेश वाघमारे ,तसेच कवी ,साहित्यिक, समाजसेवक, मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.


या आगोदर साहित्यिक डॉ जनार्दन भोसले यांना १६ राज्यस्तरीय पुरस्कार, २ राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.

या निवडी बद्दल रात्रीस खेळ चाले या मालिकेतील आण्णा नाईक भूमिका करणारे सिनेअभिनेते माधव   अभंकर , रिसर्व्ह बँकेचे मुख्य संचालक डॉ आशितोष रारावीकर,गुप्तचर अधिकारी श्री संतोष देसाई , प्राचार्य डॉ राजेंद्र थोरात, साहित्यिक लक्ष्मीकांत रांजणे, अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलसचिव श्री शिवाजी शिंदे , तसेच साहित्यिक, सामाजिक शैक्षणिक, पत्रकार ,मित्र परिवार, या विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले.

To Top