स्वर्गीय आदर्श शिक्षक व्यंकटराव शेंडगे यांचा स्मृतिदिन जोगानंद विद्यालय पारगाव घुमरा येथे साजरा
आटपाडी kd24news :पारगाव घुमरा ता. पाटोदा येथील जोगानंद विद्यालयातील एक आदर्श शिक्षक स्वर्गीय व्यंकटराव शेंडगे सर यांचा स्मृतिदिन त्यांचे तिन्ही चिरंजीव अतिराज, राजपाल आणि रोहित यांनी साजरा केला.
सर्वप्रथम सरपंच सौ घुमरे माजी पंचायत समिती सदस्य गुलाबराव घुमरे माजी मुख्याध्यापक संजय सावंत सेवानिवृत्त शिक्षक श्री भालचंद्र अहिरे बंकटराव लहाने या सर्वांच्या हस्ते सरांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून कार्यक्रम सुरू झाला अतिराज याने कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले वर्ग दहावी मध्ये प्रथम द्वितीय तृतीय येणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनींना स्मृतिचिन्हे आणि रोख रक्कम देऊन सत्कार करण्यात आला. शाळेतील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींना परीक्षेसाठी पॅड वाटप शेंडगे सरांच्या मुलांनी केले कार्यक्रमास उपस्थित असणारे संजय सावंत सर शेंडगे सरांच्या आठवणी जागवल्या बक्षीस पात्र विद्यार्थ्यांचे कौतुक केले आणि वर्ग दहावीतील विद्यार्थ्यांना पुढच्या वर्षीचे बक्षीस मानकरी व्हा असा संदेश दिला शाळेबद्दल बोलताना इंग्रजी माध्यमाच्या शाळेमुळे शहराच्या आकर्षणामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी शहराकडे धाव घेऊ लागले त्यामुळे शाळेतील संख्या कमी झाली हे विशद केले यानंतर भालचंद अहिरे लहाने सर यांनीही आपले मनोगत व्यक्त केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमान कोकाटे सरांनी केले या कार्यक्रमासाठी शाळेतील आजी माजी विद्यार्थी प्रतिष्ठित नागरिक महिलावर्ग व शाळेतील सर्व शिक्षक विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होत्या
शेवटी शाळेतील मोरे सरांनी उपस्थित आमचे आभार मानले