आटपाडीतील गेळे बंधू व चर्च इमारतीच्या अतिक्रमण कारवाई संदर्भात सकल हिंदू समाज्याच्या वतीने निवेदन
कारवाई न झाल्यास सकल हिंदू समाजाच्या वतीने आंदोलनाचा इशारा:
आटपाडी kd24news :भिंगेवाडी ता. आटपाडी येथे नगरपंचायत हद्दीमध्ये गट नं. ५७ मध्ये संजय दादा गेळे, विलास दादा गेळे, मोहन दादा गेळे यांनी अनधिकृतपणे केलेल्या बांधकामाचे संदर्भात व त्यां बांधकामाचा बेकायदेशीरपणे चर्च म्हणून वापर करून व त्यामध्ये अनधिकृतपणे गोरगरीब जनतेवर जादूटोणा करून धर्मातरण करीत असलेबाबत संबंधीतांवर कार्यवाही होणेबाबत तक्रार अर्ज निवेदनाद्वारे मा. मुख्याधिकारीसोो नगरपंचायत आटपाडी व आटपाडी पोलीस निरीक्षक विनय बहिर यांना सर्व सकल हिंदू समाज यांच्या वतीने देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की,गेळे बंधूनी एम आर टी पी कायदा कलम ४४ नुसार कोणत्याही खात्याची परवानगी न घेता सदरील बांधकाम केले असून त्याबाबत आटपाडी नगर पंचायत (प्लॅनिंग डी पी टी) मुख्याधिकारी म्हणून सदरील अनधिकृत बांधकामावर त्वरीत कार्यवाही करणेत यावी ही विनंती. गेळे बंधूनी दोन वर्षापुर्वी नामांकीत हॉस्पीटलमध्ये जबरदस्तीने आय सी यू विभागामध्ये जावून मंत्रतंत्र म्हणून जादूटोणा केला म्हणून संजय गेळे यांचेवर आटपाडी फौजदारी न्यायालयात फौजदारी केस दाखल असून ती अद्यापी प्रलंबीत आहे तसेच त्या केसमध्ये सदरील गेळे बंधू जामीनावर बाहेर आहेत.
त्यावेळी सकल हिंदू समाज आटपाडी यांचे वतीने आटपाडी येथे मोठा मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळीच प्रशासनाने सदरील अनधिकृत बांधकामाबाबत कार्यवाही करू असे आश्वासन दिले होते. परंतू आजपर्यंत सदरील बांधकामबाबत कोणतीही कार्यवाही झालेली नाही.
त्यामुळे प्रशासन आपल्याला काहीच करू शकत नाही असा समज करून घेवून सदरील गेळे बंधूनी वरील विषयांकीत मिळकतीमध्ये बेकायदेशीरपणे चर्च चालू करून त्यामध्ये नागरीकांन पैशाचे अमिष दाखवून त्यांचेवर जादूटोणा केला जात असून त्यांचे धर्मातरण करणेचे काम चालू केले आहे.
गेळे बंधूनी कोणतीही परवानगी न घेता अनधिकृत बांधकाम करून त्याची शासन दरबारी नोंदणी न करता चर्च म्हणून वापर करणे बेकायदेशीर असून तो कायदेशीर गुन्हा आहे. त्यामुळे सदर बांधकामा बाबत त्वरीत कारवाई करणे अत्यंत आवश्यक झाले आहे. असे आटपाडी सकल हिंदू समाज यांचे कडून निवेदनात म्हटले आहे
गेळे बंधू यांनी मिळकतीमध्ये विना परवाना व अनधिकृत केलेल्या बांधकामावर एम आर टी पी कायदा १९६६ चे ४४ नुसार त्वरीत कारवाई करून सदरचे बेकायदेशीरपणे केलेले बांधकाम पाडण्यात यावे.व अनधिकृतपणे केलेल्या बांधकामामध्ये शासन दरबारी कोणतीही नोंदणी न करता चर्च म्हणून वापर करीत असल्यामुळे एम आर टी पी कायदयानुसार व जादूटोणा कायदयानुसार कडक कायदेशीर कारवाई करणेत यावी. अशी मागणी सकल सर्व हिंदू समाजातर्फे करण्यात आली आहे.