Sanvad News भाजपच्या विधिमंडळ गट नेतेपदी देवेंद्र फडणवीस

भाजपच्या विधिमंडळ गट नेतेपदी देवेंद्र फडणवीस

Admin

 भाजपच्या विधिमंडळ गट नेतेपदी देवेंद्र फडणवीस 



आटपाडी kdnews :मुबंई भाजपच्या विधिमंडळ गट नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली आहे. भाजपचे केंद्रीय निरीक्षक म्हणून आलेले केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन, आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांच्या उपस्थित भाजपच्या 132 आमदारांची बैठक आज विधिमंडळाच्या सेंट्रल हॉलमध्ये पार पडली. तत्पूर्वी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीतच या नावाचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. त्यानंतर विधिमंडळाच्या बैठकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रास्ताविक केले. तर चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. त्याला पंकजाताई मुंडे आणि प्रवीण दरेकर यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर हा प्रस्ताव विधिमंडळ गटनेता निवडीच्या बैठकीत एकमताने मंजूर करण्यात आला. त्यामुळे आता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड होणार आहे. त्या संबंधीची केवळ आता औपचारिकता बाकी असणार आहे.

-----

To Top