Sanvad News बहिर्जी नाईक औद्योगिक प्रशिक्षण संस्था विटा येथे स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय युवादिन विविध उपक्रमाने साजरा

बहिर्जी नाईक औद्योगिक प्रशिक्षण संस्था विटा येथे स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय युवादिन विविध उपक्रमाने साजरा

Admin

 बहिर्जी नाईक औद्योगिक प्रशिक्षण संस्था विटा येथे स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय युवादिन विविध उपक्रमाने साजरा 



आटपाडी kd24news :विटा रविवार 12 जानेवारी 2025 रोजी बहिर्जी नाईक औद्योगिक प्रशिक्षण संस्था विटा येथे स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय युवा दिन विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला. या अंतर्गत मागील सप्ताहातमध्ये स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये वक्तृत्व,निबंध व चित्रकला स्पर्धा मोठ्या उत्साहामध्ये घेण्यात आल्या. याचबरोबर संस्था स्तरावरील अंतर्गत क्रीडा स्पर्धा यामध्ये क्रिकेट,हॉलीबॉल,कबड्डी,कॅरम इत्यादी स्पर्धा घेऊन युवकांच्या कलागुणांना वेगळा प्लॅटफॉर्म व वाव मिळावा असे या स्पर्धेतून प्रयत्न करण्यात आले. आणि या घेतलेल्या विविध स्पर्धांमध्ये यशस्वी झालेल्या प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या स्पर्धकां बरोबर संघांना आज पारितोषिक देऊन, प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.याप्रसंगी संस्थेचे प्राचार्य श्री.आर.पी.पवार यांनी संस्थेच्या प्रशिक्षणार्थ्यांना व माजी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाप्रसंगी संस्थेतील सर्व व्यवसाय निर्देशक, गटनिर्देशक, चतुर्थ श्रेणी कर्मचारी व स्पर्धेतील विविध संघ व विद्यार्थी उपस्थित होते.

To Top