प्रशासकीय यंत्रणेचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर ; पंढरपूर बस स्थानकाचा झाला उकिरडा
आटपाडी kd24news :पंढरपूर..संपूर्ण देशाचे आराध्यदैवत श्री विठोबा च्या पंढरीतून प्रशासकीय यंत्रणेचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्याचे दिसून आले आहे . श्रीक्षेत्र विठ्ठल रूक्मिणी मंदिरापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या बसस्थानकाची अवस्था अतिशय बिकट झाली असून परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे .मोकाट जनावरांच्या मुळे अनेक अडचणी निर्माण होत आहेत .विशेषतः ज्या ठिकाणी बसेस उभ्या असतात त्याचं ठिकाणी मोकाट जनावरांनी घाण करीत आहेत.तर दुसरीकडे बसस्थानकाच्या मोकळा जागेत नागरिक शौचास बसलेले असतात .शासनाने लाखो रुपये खर्च करून शौचालय बांधून फायदा काय झाला असा प्रश्न उपस्थित केला जात आहे .विशेषतः बस स्थानक प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे .बस स्थानिक आवाराच्या मोकळ्या जागेत गार्डन करून त्यामध्ये विठोबा ची मूर्ती ठेवण्यात यावी व संपूर्ण परिसर संबंधित विभागाने स्वच्छ ठेवावा अशी मागणी पुढे येत आहे .
व्हिडिओ पहा....