Sanvad News स्वच्छंदी मैत्री कट्टा,पुणे आयोजित अनोखा हळदी कुंकू सोहळा

स्वच्छंदी मैत्री कट्टा,पुणे आयोजित अनोखा हळदी कुंकू सोहळा

Admin

 स्वच्छंदी मैत्री कट्टा,पुणे आयोजित अनोखा हळदी कुंकू सोहळा



आटपाडी kd24news :पुणे 20 बुधवार दिनांक 22 जाने सकाळी 9 ते 11 या वेळेत अनोखा हळदी कुंकू कार्यक्रम राजाराम ब्रिज, सिंहगड रोडजवळ आयोजित केला होता. 

स्वच्छंदी मैत्री कट्ट्याचे प्रमुख बाळकृष्ण नेहरकर यांनी सांगितले कि मध्यंतरी चायनीज मांज्यामुळे अनेक अपघात झाले त्यामुळे स्वच्छंदी मैत्री कट्टा, पुणे यांच्या वतीने हा अनोखा उपक्रम आयोजित केला होता कि ज्या महिला हेल्मेट घालून टू व्हिलर चालवीत होत्या अशा महिलांना हळदी कुंकू लावून मकरसक्रांत निमित्त तिळगुळ आणि खास वाण देण्यात आले.

या उपक्रमात कट्टा ग्रुप लीडर शोभाताई बल्लाळ, रोटरी च्या शामला जोशी, संगीता साहनी, मंगला खळदकर, प्रिया जैन , अनुपमा थोरात, सायकल राईडर गायत्री कळंबे तसेच हॉटेल व्यावसायिक नारायणराव शिंदे, संजीव कोरे, दिलीप राऊत, निवृत्त पोलीस दत्ता ताकवले, निवृत्त मिलिटरी अधिकारी शशिकांत गवळी, अनिल डांगे, दिलीप वनारसे उषा,मनीषा पवार,स्वाती बुंदले,स्मिता , सई गोंधळेकर, वंदना वैद्य,लीना मारणेअसे मित्र आणि मैत्रिणी तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.

या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे अनेक लोकांनी विशेष कौतुक केले.

To Top