Sanvad News आटपाडी मध्ये सोमवारी ६ जानेवारी रोजी पत्रकारांच्या वतीने दिले जाणार भूषण पुरस्कार

आटपाडी मध्ये सोमवारी ६ जानेवारी रोजी पत्रकारांच्या वतीने दिले जाणार भूषण पुरस्कार

Admin

आटपाडी मध्ये सोमवारी ६ जानेवारी रोजी पत्रकारांच्या वतीने दिले जाणार भूषण पुरस्कार 

पत्रकार दिनानिमित्त पुरस्कार वितरण कार्यक्रमांचे धमकेदार नियोजन:पत्रकार अशोक पवार 



आटपाडी kd24news :आटपाडी इलेक्ट्रॉनिक अँड प्रिंट मीडिया पत्रकार संघटनेतर्फे दरवर्षी सहा जानेवारी रोजी आटपाडी तालुक्यातील विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना आटपाडी भूषण पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. दरवर्षी प्रमाणे यावर्षी पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत दिघंची गावचे सुपुत्र सोपान काळे, ज्योतीराम काटकर, आटपाडीची कुमारी सुनीता माळी, अभिजीत माळी, संतोष अवळे तर यमाजी पाटलाची वाडी येथील प्राध्यापक सदाशिव मोरे यांना हे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.सोमवार दिनांक ६ जानेवारी 2025 रोजी पत्रकार दिनाच्या कार्यक्रमांमध्ये हे पुरस्कार वितरित केले जाणार आहेत. या कार्यक्रमाचे मुख्य पाहुणे उपविभागीय प्रांताधिकारी विक्रम बांदल आटपाडीचे तहसीलदार मनोजकुमार ऐतवडे, गट विकास अधिकारी संदीप भंडारे व पोलीस निरीक्षक विनय बहिर यांच्यासह आटपाडी तालुक्यातील विविध क्षेत्रातील उपस्थित लोकप्रतिनिधी व नागरिकांच्या उपस्थितीमध्ये हे पुरस्कार वितरित केले जाणार आहेत. याबाबतची माहिती इलेक्ट्रॉनिक अँड प्रिंट मीडिया वेल्फेअर असोसिएशन च्या वतीने देण्यात आली आहे. सदर पत्रकार दिनाच्या कार्यक्रमासाठी तालुक्यातील सर्व क्षेत्रातील नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन इलेक्ट्रॉनिक अँड प्रिंट मीडिया वेल्फेअर असोसिएशन संयोजक यांचे कडून करण्यात आले आहे. सदरचा भूषण वितरण व पत्रकार दिनाचा कार्यक्रम साठे चौक येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बचत भवन येथे सोमवारी सकाळी साडेदहा वाजता आयोजित करण्यात आला  आहे. तरी सर्वांची उपस्थिती पार्थनीय आहे.


}}}}}}}}}}}}}}}============{{{{{{{{{{{{{{


नवीन घर बांधताय तर इजिनियरचा सल्ला घ्या 👇🏻



To Top