Sanvad News लक्ष्यवेध अकॅडमी आटपाडी येथे सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

लक्ष्यवेध अकॅडमी आटपाडी येथे सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

Admin

 लक्ष्यवेध अकॅडमी आटपाडी येथे सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी




आटपाडी kd24news :दि ३ जानेवारी रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात लक्ष्यवेध अकॅडमी आटपाडी येथे साजरी करण्यात आली.

   लक्ष्यवेध अकॅडमी मधील मुला-मुलींनी सावित्रीबाई फुले यांचा जीवन प्रवास त्यांच्या शब्दातून व्यक्त केला. क्रांतिवीर सावित्रीबाई फुले यांचा जन्म, त्यांना करावा लागलेला संघर्ष, जीवनात आलेला चढ-उतार,स्त्री शिक्षणाच्या आग्रदूत,मुलींसाठी शिक्षणाची असलेली तळमळ, त्यांनी लिहिलेले काव्यसंग्रह , सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावरील चारोळ्या इत्यादी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांनी मांडल्या.

  यामध्ये विश्वांजली सावंत, शिवांश गोडसे, रिषभा नेहारकर, सुदर्शन पुजारी, आदिती जगदाळे, तनुजा बुरुंगले, वेदिका गोडसे , सर्वज्ञा भिंगे, आयुष कोळेकर, हर्षद सोलंकर, रणवीर येलपले, देवेंद्र गळवे या विद्यार्थ्यांनी मराठी,हिंदी,इंग्रजी या तिन्ही भाषेतून सावित्रीबाई फुले यांच्या संघर्षमय जीवणावर आपली मनोगत व्यक्त केली.

    या प्रसंगी प्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. हजारे सर यांनी केले. यावेळी श्री.माळी सर, सागर मॅडम, जाधव मॅडम, मोरे मॅडम, बालटे मॅडम, शिरकांडे मॅडम, पाटील मॅडम, गेजगे मॅडम, पाटील मॅडम आणि मुले -मुली आदी मान्यवर उपस्थित होते.

To Top