आटपाडी तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवराकडून मंत्री जयकुमार गोरे यांचा यथोचित सन्मान
आटपाडी : आटपाडी तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर यांचे कडून माण खटावचे पाणीदार व दमदार आमदार महाराष्ट्राचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री आदरणीय जयकुमार (भाऊ )गोरे यांची ग्रामविकास मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल दहिवडी ता.माण येथे यथोचित सन्मान करण्यात आला.
मा.आ.जयकुमार (भाऊ )गोरे यांचा सन्मान आटपाडी तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
यावेळी आटपाडी तालुक्यातील सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेचे माजी चेअरमन यु.टी.जाधव सर, सामाजिक कार्यकर्ते व बी.डी.एस बँक संचालक सावंता (मामा)पुसावळे, आटपाडीचे माजी उपसभापती भागवत माळी साहेब, माजी. जि. प. सदस्य अरुण बालटे, मार्केट कमिटी आटपाडी चे माजी संचालक पंढरीनाथ नागणे, सातारा जिल्हा शिक्षक बँक संचालक नितीन कोळे, सांगली जिल्हा शिक्षक बँक संचालक सचिन खरमाटे,माण तालुका शिक्षक समिती अध्यक्ष संतोष घोडके,सरचिटणीस चंद्रकांत जाधव,कराड पाटण पतसंस्था संचालक एम डी धडस सर ,संत सावता माळी पतसंस्था माजी चेअरमन बाबासाहेब माळी, दिघंचीचे युवा नेते प्रशांत शिंदे ,दि आटपाडी अर्बन क्रेडिट चेअरमन उत्तम बालटे,महात्मा फुले बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष बजरंग फडतारे साहेब, युवा नेते गणेश जाधव, सामाजिक कार्यकर्ते सुधाकर जाधव, सांगोला अर्बनचे दतात्रय सागर, गजानन सोसायटीचे माजी चेअरमन दत्तात्रय आडसुळ, आटपाडी सर्व सेवा सोसायटी सचिव शशिकांत सागर, सीबीएस न्यूजचे पांडुरंग हात्तेकर,आदी उपस्थित होते .