संत तुकाराम सहकारी कारखाना, कासारसाई,
संक्रात ऊसतोड कामगार महिलांसोबत साजरी,
आटपाडी kd24news :पुणे : वेध फौंडेशनची 2025.संत तुकाराम सहकारी कारखाना कासारसाई पूणे येथे ऊसतोड महिलां कामगारांसोबत कोपीवर साजरी झाली . गेली वीस वर्षे वेध फौंडेशन अध्यक्षा अॅड. डॉ. स्वाती मोराळे त्यांची महिला ब्रिगेड त्यांची संक्रात ऊसतोड कामगार महिला, मेंढपाळ करणाऱ्या महिला, भटक्या समाजातील महिला, आदिवासी महिला यांच्या सोबत महाराष्ट्र भर साजरी करत असतात.
या महिला आपल्या गावापासून दुर पोट भरण्यासाठी बाहेर पडलेल्या असतात. संक्रात हा सण त्यांच्या जिव्हाळाचा असतो. या आनंदा पासून त्या वंचित राहु नये म्हणून वेध फौंडेशनने हा
सामाजिक उपक्रम असून
सामाजिक भावनेतून हा उपक्रम सुरु केला होता. यामध्ये आज पर्यंत एक लाखाहून अधिक साड्या, स्वेटर, ब्लॅकेट वाटप करून या महिलांना मदत करण्याचे काम या महिला करत आहे. यांच्या अनेक मुलांना स्टार वन सिक्युरिटीच्या माध्यमातून नौकरी मिळवून दिल्या आहेत. पुढील पिढी ऊसतोडी पासून दुर राहावी यासाठी प्रयत्न करत आहेत. लहान मुलांचे
शिक्षण, आरोग्य यासाठी काम करत आहेत. यावर्षी दहा हजार महिला व लहान मुलांना ब्लॅकेट वाटप करीत आहोत तरी ज्या दानशूर व्यक्तीना वस्त्रदान करायचे आहे त्यांनी संस्थेस
ब्लॅंकेट नाही जीवनावश्यक वस्तू
द्यावे किंवा आपली मदत गरजू लोकांना देत असतो, असे आव्हान वेध फौंडेशन च्या अध्यक्षा अॅड. डॉ. स्वातीताई मोराळे यांनी केले आहे. आपली मदत गरजु व्यक्ती पर्यंत पोहचवण्याचे काम आम्ही करीत असतो,
या कार्यक्रम ला महिलांची उपस्थिती मोठ्या संख्येने होती