टेंभू योजनेच्या सहाव्या टप्याच्या पाण्यासंदर्भातील वितरिका कामातील गैरप्रकाराबद्दलचे उपोषण चौथ्या दिवशी सुरूच
उपोषणाच्या चौथ्या दिवशी ही उपोषणा मधील मागण्यांची दखल जिल्हा प्रशासन लघु पाटबंधारे विभागाने घेतलेली नाही. त्यामुळे अशोक पवार,नवनाथ रणदिवे यांची तब्बेत बिघडली BP वाढला, यामध्ये उपोषणास बसलेले यांचा अशक्तपणा वाढला.
आटपाडी kd24news :दिनांक:- 16 जानेवारी 2025 रोजी उपोषण कर्ते यांनी प्रसिद्धीपत्रका मार्फत म्हटले आहे की,पाटबंधारे विभागाचे पुण्याचे मुख्य अभियंता हणमंत गुणाले हेच स्थानिक आटपाडीतील उपअभियंता शिवाजीराव पाटील यांच्या भ्रष्ट कारभारास पाठीशी घालत आहेत. तसेच सहाव्या टप्प्याच्या चुकीच्या कामाचे खरे सूत्रधार हे हणमंत गुणालेच आहेत हा आमचा जाहीर आरोप आहे.
आम्ही उपोषणकर्ते शेखर रणदिवे, बळीराम रणदिवे, नवनाथ रणदिवे, अशोक पवार, राहुल बुधावले रा. दिघंची ता. आटपाडी, जि. सांगली प्रसिद्धी पत्रकारद्वारे कळवतो की, सोमवार दिनांक 13 जानेवारी 2025 पासून आम्ही टेंभू योजनेच्या सहाव्या टप्याच्या पाण्यासंदर्भातील वितरिका कामातील गैरप्रकाराबद्दल उपोषणास बसलो आहोत. आज रोजी दिनांक 16 जानेवारी रोजी चौथ्याही दिवशी आमच्या उपोषण मागण्यांची दखल जिल्हा प्रशासन लघु पाटबंधारे विभागाने घेतलेली नाही. आमचा उपोषणाचा विषय असा आहे की, दिघंची, पुजारवाडी, पांढरेवाडी, विठ्ठलापूर, कौटोळी, उंबरगाव, पिंपरीखुर्द, आंबेवाडी, बोंबेवाडी या वंचित गावांना सदर चालू असलेल्या सहाव्या टप्प्याच्या कामातून पाणी मिळणार नाही. मिळाले तरी ते कमी हेक्टर क्षेत्रासाठीच मिळणारे आहे.
07 डिसेंबर 2023 ला आमदार गोपीचंद पडळकर यांच्या निवासस्थानी आटपाडी उपअभियंता शिवाजी पाटील, जिल्हा कार्यकारी अभियंता महेश रासनकर यांनी येऊन स्क्रीनवर या सहाव्या टप्याच्या कामाचे प्रेझेंटेशन केले. तसेच या संदर्भातील प्रोजेक्ट नकाशाही दाखवला. यावेळी आटपाडी आणि सांगोला तालुक्यातील दोन हजार शेतकरी उपस्थित होते. त्यावेळेस या शेतकऱ्यांना या अधिकाऱ्यांनी सांगितले की प्रत्येक शेतकऱ्याला मुबलक पाणी मिळणार आहे. आणि केवळ 28 दिवसानंतरच 5 जानेवारी 2024 रोजी या सदरच्या गावावरून जाणारा सर्वे या अधिकाऱ्यांनी भलतीकडेच वळवला. तो कामत ते शेरेवाडी पासून विठ्ठलापूरच्या पूर्व भागाकडून खवासपूर मार्गे सांगोला तालुक्यातील जास्त क्षेत्र भिजवण्यासाठी नेला. असा हा आमचा स्पष्ट आरोप आहे. तसेच कामथ ते शेरेवाडी या 17 किलोमीटर एक्सप्रेस लाईनची खुदाई खोल दहा फूट असताना तसेच पाच फुट व्यासाची पाईप पूर्णपणे जमिनीत गाडणे असतानाही ती दीड फुटाने जमिनीवर आहे आणि ती उंचवट्याने हे अधिकारी मुजवत आहेत. तसेच पूर्वीचा सर्वे झालेला मार्ग वळवल्याने आपसुकच दिघंची, विष्ठ्ठलापूर, पुजारवाडी, पांढरेवाडी, उंबरगाव, दडसवाडी, पिंपरी खुर्द, आंबेवाडी, बोंबेवाडी ही गावे पाण्याविना कायम बंचितच राहणार आहेत. सहाव्या टप्प्याची टेंभूची योजना शेतकऱ्यांच्या शेतीसाठी आहे की भ्रष्ट अधिकारी आणि राजकारण्यांसाठी आहे ?
अशा अधिकारी आणि काही भ्रष्ट राजकारण्यांमुळेच या गावांना भविष्यात पाण्यापासून कायमचे वंचित राहावे लागणार आहे. 2019 पासून ते 7 डिसेंबर 2023 पर्यंत जो पहिला सर्वे झाला त्याच भागातून या अभियेता लोकांनी वितरिकेचा हाच मार्ग म्हणून कायम पुढे खुदाई केली तरच आम्ही उपोषण सोडू, अन्यथा प्राण गेला तरी बेहत्तर पण आम्ही शेतकऱ्यांसाठी उपोषण स्थळीच मरायलाही तयार आहोत.
तसेच स्थानिक पाटबंधारे उपअभियंता आटपाडीचे शिवाजी पाटील यांना हाताशी धरून हा गैरप्रकार पुण्याचे मुख्य अभियंता हनुमंत गुणाले यांनीच केल्या असल्याचा आमचा स्पष्ट आरोप आहे. कारण ते यापूर्वी जिल्हा अधीक्षक अभियंता म्हणून सांगली जिल्ह्याचा कारभार पाहत होते. तसेच 13 जानेवारीच्या आमच्या उपोषणापासून आटपाडी अभियंता शिवाजी पाटील मेडिकल रजेचे निमित्त करून कर्तव्यापासून फरार आहेत. त्यांचा व त्यांना पाठीशी घालणाऱ्या हनुमंत गुनालेंचा आम्ही जाहीर निषेध करीत आहे. उपोषणाच्या चौथ्या दिवशी आम्हा उपोषणकर्त्यांची तब्येत बिघडलेली आहे. तरीसुद्धा आम्ही शेतकऱ्यांसाठी हे आमरण उपोषण चालूच ठेवणार आहे. प्राण गेला तर बेहत्तर पण हे उपोषण आम्ही सोडणार नाही. हा आमचा इरादा आहे. आमच्या उपोषणाला पाठींबा आटपाडी तालुक्यातील शेतकरी, ग्रामस्थ, नेते मंडळी तसेच उंबरगाव, पुजारवाडी, विटलापूर ग्रामपंचायतीचे तसेच दिघंची आणि घरनिकी ग्रामस्थांचे प्रसिद्धीपत्रका मध्ये उपोषणकर्ते शेखर रणदिवे, बळीराम रणदिवे, नवनाथ रणदिवे, अशोक पवार, राहुल बुधावले यांनी आभार वेक्त केले आहेत.
आटपाडी तहसीलदार मनोजकुमार ऐतवडे यांची उपोषणास भेट......
दि. १६ रोजी आज सायंकाळी तहसीलदार मनोजकुमार ऐतवडे यांनी उपोषणस्थळी भेट दिली. यावेळी उपोषणकर्ते यांच्या तब्बेतेची विचारपूस करुन,सर्व परिस्थिती कलेक्टर व प्रांत साहेब यांना फोन द्वारे कळवण्यात आली. यावेळी तहसीलदार म्हणाले की, उपोषणास बसल्यावर मी स्वतःसर्व माहिती लघु पाटबंधारे अधिकारी यांना देऊन भेट घेण्यास सांगितले होते मात्र त्यांनी अजून भेट न घेतल्याने तहसीलदार यांनी खंत वेक्त केली.व याबद्दल दखल घेण्यासाठी वरिष्ठाना कळवु असा शब्द दिला.