दिघंची येथे कृषि उत्पन्न बाजार समितीच्या एक हजार मे.टन गोदाम "वेअर हाऊस"चे भूमीपूजन संपन्न
आटपाडी kd24news :दिघंची ता.आटपाडी कृषि उत्पन्न बाजार समिती, आटपाडीचे उपबाजार आवार दिघंची येथे एक हजार मे.टन गोदाम क्षमतेचे "वेअर हाऊस" चे भूमी पूजन समारंभ दि. ०४ जानेवारी २०२५ रोजी शनिवार सकाळी ९:३० वाजता प्रमुख उपस्थिती मा. सुहासभैय्या बाबर आमदार खानापूर-आटपाडी मतदार संघ व मा. तानाजीराव पाटील (अध्यक्ष) संचालक, सांगली जिल्हा म.सह. बँक लि. सांगली, यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून उद्घाटन करणेत आले.
या उद्घाटन प्रसंगी मा. लक्ष्मण सरगर, रासप जिल्हा अध्यक्ष, मा. अमोल मोरे, सरपंच दिघंची, मा. मुन्नाभई तांबोळी, मा. उपसरपंच दिघंची, मा. विष्णू यादव, मा. उपसरपंच दिघंची, मा. आगतराव (दादा) माने, उपसरपंच दिघंची, मा. ब्रम्हदेव व्होनमाने, व्हा. चेअरमन माणगंगा सहकारी साखर कारखाना, सोनारसिध्दनगर, कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती मा.पै. संतोष (भाऊ) पुजारी, कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक मा. सुबराव पाटील, मा. अमोल काटकर, सुनिल सरक, मा. सुनिल तळे, मा. शरदचंद्र काळेल, मा. दादासाहेब सरगर तसेच मा. कैलास देवडकर, मा. राम सुर्यवंशी, सरपंच खानाजोडवाडी, मा. दत्ता (पंच) पाटील, मा. बाळासाहेब होनराव, मा. दत्ता पाटील, जिल्हा नियोजन समिती सदस्य, मा. बंडू कातोरे, शिवसेना तालुका उपाध्यक्ष मा. साहेबराव पाटील, शिवसेना तालुका अध्यक्ष, इत्यादी प्रतिष्ठीत मान्यवर व शेतकरी, व्यापारी तसेच विविध सोसायटीचे चेअरमन, व्हा. चेअरमन, सदस्य, विविध ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य उपस्थित होते.
या "वेअर हाऊस" बाजार समितीने सुविधा उपलब्ध करुन दिले नंतर शेतकरी यांच्या शेतमालास कमी भाव असेल त्यावेळी साठवणूकीसाठी याचा अत्यन्त उपयोग होणार असून, शेतमालाला जादा बाजारभाव मिळेल, त्यावेळी शेतकरी "वेअर हाऊस"मधील आपला शेतमाल विकला जाऊन शेतकरीर्यांचा यामध्ये आर्थिक फायदा मोठा होणार आहे. तसेच शेतमाल तारण कर्ज योजना राबविता येऊन याचा लाभ सर्व शेतक-यांना होणार आहे.या बाबतची सर्व माहिती उपस्थित शेतकरी व मान्यवर सर्वांना कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती मा.पै संतोष (भाऊ) पुजारी यांनी दिली. व कार्यक्रमाचे शेवटी बाजार समितीचे सचिव श्री शशिकांत जाधव यांनी सर्वांचे आभार मानले.