Sanvad News कराड वारुंजी येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात मुकुंद भट यांचा जीवन गौरव पुरस्काराने सन्मान!

कराड वारुंजी येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात मुकुंद भट यांचा जीवन गौरव पुरस्काराने सन्मान!

Admin

 कराड वारुंजी येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात मुकुंद भट यांचा जीवन गौरव पुरस्काराने सन्मान!




कराड ता. 3: मराठी भाषेस प्राचीन इतिहास व उज्वल परंपरा आहे. अनेक भाषाचे मूळ मराठीच आहे. तिचे संवर्धन व समृद्ध होण्यास गावोगाव साहित्य संमेलन झाले पाहिजे, तसेच नवोदित लेखक व कवींनी समाज प्रबोधनाचे काम करावे, असे आवाहन मराठी साहित्य संमेलन अध्यक्ष डॉ. पुरुषोत्तम कृष्णाजी बारसावडे (कोरेगाव) यांनी केले.


कराड 3

 यशवंतराव चव्हाण साहित्यनगरीत झालेल्या मराठी साहित्य मंडळाचे संमेलन आणि राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याच्या प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मराठी साहित्य, मंडळं राष्ट्रीय अध्यक्ष संपूर्ण महाराष्ट्राला सुपरिचित असलेले, आपल्या परखड लेखणीने आपले वेगळे पण सिद्ध करणारे ज्येष्ठ साहित्यिक डॉ जयप्रकाश घुमटकर, हे उपस्थित होते,


कराड,पत्रकार मुकुंद भट यांना पुरस्कार प्रदान करताना अॅड. पुरुषोत्तम बारसावडे, डॉ. जयप्रकाश घुमटकर, डॉ. विनायकराव जाधव, भारती झिमरे, ललिता गवांदे, गजानन माने, अविनाश जगताप आदी.उपस्थित होते 


मंडळाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर होते.


मावळते संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ लेखक डॉ. विनायकराव जाधव


(पुणे), स्वागताध्यक्ष सुरेश लोहार (कन्हाड) व मुख्य अतिथी ललिता गवदि (नाशिक), राजेश थळकर (रायगड), गजानन माने (कन्हाड), सुनंदा बागडे (कोल्हापूर), भारती झिमरे (सातारा) व विशेष अतिथी प्रतिभा गजरमल, मनीषा महाजन, शिवराज माने, जगदीश वाघ, अविनाश जगताप, सचिन पाटील, उद्योजक नामदेव पाटील, वारुंजीच्या सरपंच शोभा चव्हाण उपस्थित होते.


ज्येष्ठ पत्रकार मुकुंद शिवराम भट, कराड,यांना राज्यस्तरीय क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जीवनगौरव पत्रकार भूषण पुरस्कार व सन्मानपत्र, गौरव चिन्ह,अँड.बारसावडे, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर, यांच्या हस्ते देऊन गौरवण्यात आले..


राज्यस्तरीय काव्य स्पर्धेत प्रथम क्रमांक सविता पोतदार,टाळगाव,कराड,, द्वितीय क्रमांक रूपाली राऊत बोईसर,तृतीय क्रमांक सावकर जाधव कराड,उत्तेजनार्थ बक्षीस प्रांजल पाटील टिटवाळा, व प्रमोद कुंभार यांना मिळाले,


सुरेश लोहार लिखित 'कन्हाहाप्रीती' कथासंग्रहाचे प्रकाशन डॉ. जयप्रकाश घुमटकर यांच्या हस्ते झाले. तानाजी जगताप (माण) यांनी समारोप केला. पुढील साहित्य संमेलन धुळे येथे होणार आहे.

To Top