Sanvad News उत्कर्ष अबॅकस क्लासेसचे पुणे येथे झालेल्या नॅशनल लेव्हल कॉम्पिटिशन मध्ये घवघवीत यश

उत्कर्ष अबॅकस क्लासेसचे पुणे येथे झालेल्या नॅशनल लेव्हल कॉम्पिटिशन मध्ये घवघवीत यश

Admin

 उत्कर्ष अबॅकस क्लासेसचे पुणे येथे झालेल्या नॅशनल लेव्हल कॉम्पिटिशन मध्ये घवघवीत यश




   आटपाडी kd24news :पुणे.AIAMA अबॅकस या इंटरनॅशनल असोसिएशन संचलित उत्कर्ष क्रिएशन मार्फत पुणे येथे झालेल्या नॅशनल लेवल परीक्षेमध्ये उत्कर्ष अबॅकस क्लासेस आटपाडी /निंबवडे येथील २४ विद्यार्थीनी भाग घेतला होता. या स्पर्धेसाठी संपूर्ण भारतातील किमान ११०० विध्यार्थी यांनी सहभाग घेतला होता. या सर्व विद्यार्थ्यांमधून आटपाडी तालुक्यातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले आहे. त्यामध्ये १ विद्यार्थ्याला चॅम्पियन ऑफ चॅम्पियन ,२ विद्यार्थ्यांना चॅम्पियन अवॉर्ड व ११ विद्यार्थ्यांना विनर वन ६ विद्यार्थ्यांना विनर टू ,४ विद्यार्थ्यांना विनर थ्री अवॉर्ड मिळाला. यापैकी १४ विद्यार्थ्यांची इंटरनॅशनल परीक्षेसाठी मलेशिया येथे निवड झाली आहे. तरी या सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले.

         ही परीक्षा ३ मिनिटाची असून या परीक्षेमध्ये A,B व C कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना तीन मिनिटात १०० प्रश्न सोडवायचे असतात.

         तसेच उत्कर्ष अबॅकस क्लासेस चे सर्वेसर्वा यशश्री बालटे मॅडम यांना देखील चॅम्पियन फ्रॅंचाईजी अवॉर्ड मिळाला तसेच बालटे मॅडम यांना AIAMA अबॅकस ची सांगली जिल्ह्याची मास्टर फ्रेंचाईजी देखील देण्यात आली आहे, त्याबद्दल उत्कर्ष क्रिएशन चे संचालक श्री अमित शिंदे व सौ.संध्या शिंदे मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले असून त्यांचेही मनःपूर्वक आभार मानण्यात आले. वरील सर्व विद्यार्थ्यांना यशश्री बालटे मॅडम संध्या शिंदे मॅडम अमित शिंदे सर यांचे मार्गदर्शन लाभले.

       या स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचे तालुकास्तरातून व शिक्षक ,पालक व पंचक्रोशीतील सर्व नागरिकांच्या कडून कौतुक होत आहे आणि सर्वच विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे.


 अवार्ड प्राप्त विद्यार्थी:

चॅम्पियन ऑफ चॅम्पियन अवॉर्ड मिळालेले विद्यार्थी

१.अथर्व प्रशांत देवडकर.

चॅम्पियन अवॉर्ड मिळालेले विद्यार्थी १. गौरव धर्मेंद्र जाधव,२. सार्थक सुखदेव जाधव 

विनर १ st अवॉर्ड मिळालेले विद्यार्थी १. राजेश्वरी राहुल कबीर,२. स्वरा कल्याण जाधव,३.ओंकार राहुल कबीर,४.सुमित शंकर माळी,५. करण माळी,६.अनुज संजय पिंजारी.७.पियुष पोपट बालटे, ८.वरद देवडकर, ९.रिया लोखंडे, १०.स्वरा मोटे, ११.अवधूत माने.

विनर 2nd अवॉर्ड मिळालेले विद्यार्थी.१. शरण्या पाटील.२.श्रेयस कबीर, ३.अभिमन्यू जाधव. ४.श्रुतिका पाटील, ५.अवधूत कबीर. ६.पायल जाधव 

विनर 3rd अवॉर्ड मिळालेले विद्यार्थी, १.मृणाली मोटे. २.दिया माळी. ३.वेद राऊत. ४. श्रेयस मोटे

To Top