Sanvad News फुले एज्युकेशन तर्फे महिला शिक्षक दिन सुरू केल्याबद्दल तेलंगणा राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.भट्टी विक्रमारका मालू सन्मानित

फुले एज्युकेशन तर्फे महिला शिक्षक दिन सुरू केल्याबद्दल तेलंगणा राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.भट्टी विक्रमारका मालू सन्मानित

Admin

फुले एज्युकेशन तर्फे महिला शिक्षक दिन सुरू केल्याबद्दल तेलंगणा राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.भट्टी विक्रमारका मालू सन्मानित



आटपाडी kd24news :हैद्राबाद. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त या वर्षी पासून तेलंगणा राज्यात सावित्रीबाई फुले यांनी देशात महिलांना शिक्षण सुरू करीत सामाजिक आणि शैक्षणिक कार्यात अलौकिक असे महान कार्य केले त्या कार्याचा वसा वारसा विचार पुढील पिढीला प्रेरणादायी मिळत राहो म्हणून त्यांचा जन्म दिवस 3 जानेवारी हा भारतात प्रथम तेलंगाना राज्याने 3 जाने.25 पासून सर्वत्र लागू करून तसा शासकीय निर्णय काढून सर्व ठिकाणी महिला शिक्षक दीन मोठ्या दिमाखात विविध कार्यक्रमाने साजरा केला म्हणून राज्याचे मुख्यमंत्री मा.ना. रेवंत रेड्डी यांना आम्ही 10 Feb 25 भेटीचे वेळ मागितली तरी देखील त्यांनी दिली होती परंतु विधान परिषद निवडणूक कामामुळे अचानक मीटिंग ला गेल्याने आमच्या 4 राज्याचे प्रमुख प्रतिनिधी व फुले शाहू आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फाउंडेशन च्या वतीने महात्मा फुले प्रजा भवन हैद्राबाद येथे दि.10 फेब्रुवारी 2025 रोजी स.11 वाजता तेलंगणा राज्याचे उप मुख्यमंत्री मा.ना.भट्टी विक्रमारका मालू यांना महात्मा फुले पगडी घालून, उपरणे आणि महात्मा फुले समग्र वाडमय,आम्ही पाहिलेले फुले आणि दिनांची साउली महात्मा फुले गीत चरित्र , लेखक रघुनाथ ढोक लिखित मराठी,हिंदी,इंग्रजी व जर्मन भाषेतील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले ग्रंथ व मराठी तेलगू भाषेतील सत्यशोधक विवाह माहिती पुस्तकं,फुले दाम्पत्य फोटो फ्रेम भेट देऊन सावित्रीबाई फुले यांचे वारस डॉ.दिलीप नेवसे,अखिल भा.माळी महासंघाचे अध्यक्ष विलास पाटील, कार्याध्यक्ष शिवदास महाजन, तेलंगणा राज्याचे प्रा.सुकुमार पेटकूले , महात्मा फुले चरित्र साधने प्रकाशन समिती महाराष्ट्र शासन चे सत्यशोधक रघुनाथ ढोक व गुजरात चे डॉ.शामराव फुले मध्यप्रदेश चे कैलास वाघेला यांनी सन्मानित केले.




यावेळी प्रगती भवन चे नाव महात्मा फुले प्रजा भवन नाव दीलेबध्दल सर्व प्रतिनिधीनी सरकारचे अभिनंदन करीत शालेय शिक्षण पद्धतीमधे सर्व मुलांना प्रेरणा मिळावी म्हणून फुले दाम्पत्य यांचे जीवन,कविता तसेच इतर महापूर्षांचे धडे असावीत अशी मागणी देखील केली. यावेळी ऑफिस मद्ये जास्त प्रतिनिधीना भेट देऊ शकत नसल्याने उप मुख्यमंत्री यांनी सर्वांना भेटण्यासाठी आवरजूंन बाहेर येऊन सर्व प्रतिनिधी सोबत सन्मानाचा स्वीकार करीत सर्वांचा परिचय घेऊन फोटो काढले आणि खास चहापान केला त्याबद्दल सत्यशोधक रघुनाथ ढोक यांनी आभार व्यक्त केले. तर कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी प्रा.सुकुमार पेटकुले, सौ.विनोदां नगोसे, मेंगाजी गुरुनुले,मुरलीधर नगोसे, सतीश गुरूनुले,शभाना शेंडे,नारायण गुरुनुले,गणेश माळी,विनोद गुरुनुले, कृष्णा भेंडारे यांनी मोलाचे सहकार्य केले.



To Top