छत्रपती संभाजी साहित्य संमेलन १२ मार्च रोजी सासवडला होणारसं:मेलनाचे मुख्य प्रवर्तक दशरथ यादव यांची माहिती
पुणे, दि.१३ : राज्यस्तरीय सोळावे छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलन दि. १२ मार्च २०२५ रोजी सासवड (ता.पुरंदर) येथे होणार आहे, अखिल भारतीय मराठी साहित्य संशोधन परिषद व जगदगुरु तुकोबाराय साहित्य परिषद यांच्या वतीने साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती संमेलनाचे मुख्य प्रवर्तक व ज्येष्ठ साहित्यिक दशरथ यादव यांनी दिली.
साहित्य संमेलनात उद्घाटन समारंभ, कथाकथन, पुस्तक प्रकाशन, पुरस्कार वितरण, ग्रथदिंडी, नाट्यप्रयोग, परिसंवाद, कविसंमेलन असे भरगच्च कार्यक्रम होणार आहेत. संमेलनाच्या नियोजनासाठी आयोजित केलेल्या बैठकीला राजाभाऊ जगताप, दत्तनाना भोंगळे, सुनिल लोणकर, शामराव मेमाणे, गंगाराम जाधव, सुनिल धिवार, दीपक पवार, संजय सोनवणे, दत्ता कड, प्रफुल्ल देशमुख, राजेश काकडे, अरविंद जगताप आदी उपस्थित होते
छत्रपती संभाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या कऱ्हा काठावर साहित्य संमेलन होणार आहे.
संमेलनात राज्यभऱातून लेखक, कवी मोठ्या प्रमाणावर सहभागी होणार आहेत. संमेलनात सहभागी होऊ इच्छिणा-या लेखक,कवींनी मो. 9881098481 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन राजाभाऊ जगताप यांनी केले आहे.