फुले एज्युकेशन तर्फे शिवजयंती दिनी हिंगोली येथे होणार सत्यशोधक पद्धतीने गृहप्रवेश सोहळा !!!
आटपाडी kd24news :हिंगोली.फुले शाहु आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फौंडेशनच्या वतीने हिंगोली ,कळमनुरी येथे सामाजिक कार्यकर्ते सत्यशोधक बाळासाहेब राघोजी भालेराव यांच्या आजीच्या नावाने असलेले “सरस्वती सदन “ चा वास्तू पूजन व गृहप्रवेश सोहळा कुळवाडी भूषण युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९५ जयंती निमित्त दि.१९ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. या परिसरात प्रथमच सत्यशोधक पध्दतीने कार्य होत आहे.याप्रसंगी घरांसाठी ज्या मजुरांनी काम केले त्यांचा यथोचित सन्मान करून घराचे परिसरात फळझाडे व इतर झाडे लावून वृक्षसंवर्धन करणार आहेत तसेच आलेल्या सर्व पाहुण्यांना महापुरुषांचे ग्रंथ भेट देणार आहेत.
.या पूजेसाठी विधिकर्ते म्हणून संस्थेचे अध्यक्ष व महात्मा फुले चरित्र साधने साहित्य व प्रकाशन समितीचे सदस्य सत्यशोधक रघुनाथ ढोक हे कार्य मोफत सिद्धीस नेणार आहेत. ढोक यांनी महाराष्ट्रात व तेलंगाणा राज्यात आतापर्यंत गेल्या ५ वर्षात ५० सत्यशोधक विवाह व हा १० वा वास्तू पूजन गृहप्रवेश सोहळा विधी कार्य अंधश्रद्धा , कर्मकांड ,मुहूर्त याला फाटा देत ज्या प्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांनी गड किल्ले जिंकले बांधले यासाठी कोणताही महुर्थ, वेळ ,काळ वगेरे पाहिले नाही त्याच धर्तीवर शिवजयंती हा शुभदिवस म्हणून सोहळा आयोजित केल्याचे ढोक व आयोजक सत्यशोधक बाळासाहेब भालेराव म्हणाले .