बांधकाम कामगारांच्या कल्याणकारी मंडळाचे नवीन पोर्टल मधील लाभाच्या अर्जात दुरुस्ती करण्याची सुविधा उपलब्ध करा : संजय भूपाल कांबळे,जिल्हा संपर्कप्रमुख
वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनचे सहाय्यक कामगार आयुक्त यांना निवेदन.
आटपाडी kd24news :सांगली दि २५ बांधकाम कामगारांच्या सोयीसाठी मंडळाने नवीन पोर्टल चालू केले आहे व या पोर्टल मधून बांधकाम कामगारांच्या लाभाचे अर्ज सादर केले जातात. परंतु नवीन पोर्टलमध्ये बांधकाम कामगारांना अडचणी येत आहे कामगार अशिक्षित असल्यामुळे चुकीचे किंवा नजर चुकीने एखादे वेगळे कागदपत्र अपलोड होऊ शकते परंतु त्या दुरुस्ती करणे गरजेचे आहे. तसेच मंडळाच्या नव्याने स्थापन केलेल्या समिती मध्ये कामगार प्रतिनिधी आणि मालक प्रतिनिधी यांची कायदेशीर नियुक्ती करून मंडळाचा कारभार पारदर्शक पद्धतीने चालवा या व इतर मागण्या साठी वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार यांनी यांच्या वतीने सहाय्यक कामगार आयुक्त मुजावर यांना विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले या निवेदनामध्ये
1) नोंदीत बांधकाम कामगारांने योजना मिळणे संदर्भात स्वतःहाचे दाखल केलेला अर्ज तालुका सुविधा केंद्रात पडताळणी करण्यासाठी गेल्यावर एखादे कागदपत्रे नजरचुकीने चुकीचे भरलेले असल्यास कामगार सुविधा केंद्रावर ताबडतोब नव्याने योग्य कागदपत्रे मंडळाच्या पोर्टल वर दाखल करण्याची बांधकाम कामगारांना मुभा मिळावी.
2) नोंदीत बांधकाम कामगारांचे गेल्या वर्षातील लाभाचे अर्ज रिजेक्ट केलेले तसेच निवडणुकीत आचारसंहिताच्या नावाखाली मंडळाची वेबसाईट बंद असल्यामुळे भरले गेले नाहीत असे अर्ज चालू वर्षात भरण्यासाठी मंडळाच्या पोर्टलवर वेगळी सोय करावी.
3) ऑनलाईन पोर्टल मध्ये अर्ज सादर करते वेळी निवडलेल्या अपॉइंटमेंटच्या तारखे ऐवजी दुसरीच तारीख येत आहेत ही तांत्रिक अडचण दूर करावे.
4) नोंदीत बांधकाम कामगारांना तात्काळ काळामध्ये कामगाराला रिअपॉइंटमेंट घेण्याची सुविधा असावी.
5) नोंदणी प्रोफाईल मध्ये नजरचुकीने झालेल्या किंवा काही अवश्यक बदल करण्याची गरज असताना मंडळाकडून तसे अर्ज तात्काळ अपडेट करावे.
6) अपॉइंटमेंट च्या तारखा वितरित झालेले दिसत नाहीत. त्यामुळे तारखा निवडताना अडचणी येतात. तांत्रिक अडचणी लवकरात लवकर निकाली काढण्यात येऊन तसेच बांधकाम योग्य कागदपत्रे पाहून विनाविलंब लाभ देऊन बांधकाम कामगार व त्यांच्या कुटुंबियांच्या शुभेच्छा घ्याव्यात.अशा विविध मागण्याच्या साठी निवेदन देण्यात आले. यावेळी, पश्चिम महाराष्ट्र महासचिव प्रशांत वाघमारे साहेब, पश्चिम महाराष्ट्र निरिक्षक रूपेश तामगावकर, जिल्हा संपर्कप्रमुख संजय भूपाल कांबळे, जिल्हाध्यक्ष संजय संपत कांबळे, जिल्हा महासचिव अनिल मोरे सर, जिल्हा कार्याध्यक्ष जगदिश कांबळे, जिल्हा कार्याध्यक्ष हिरामण भगत, सांमिकु मनपा क्षेत्र अध्यक्ष युवराज कांबळे, सांगली शहर अध्यक्ष संगाप्पा शिंदे, कुपवाड शहर अध्यक्ष बंदेनवाज राजरतन, जिल्हा सदस्य विशाल कांबळे आसलम मुल्ला, गणेश मासाळे,अरूण नाटेकर, निखिल आठवले,कैयुम मुजावर, रियाज मुजावर, विजय आवटी, संदिप कांबळे, सुभाष पाटील, जावेद आलासे, चंद्रकांत कांबळे, विक्रांत गायकवाड यांच्या बरोबर बांधकाम कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.