Sanvad News क्रांतीसुर्य लहुजी वस्ताद साळवे यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रम

क्रांतीसुर्य लहुजी वस्ताद साळवे यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रम

Admin

 क्रांतीसुर्य लहुजी वस्ताद साळवे यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रम



आटपाडी kd24news :विटा....जगेन तर देशासाठी आणि मरेन तर देशासाठी अशी सिंहगर्जना करणारे क्रांतीगुरु क्रांतीसुर्य लहुजी वस्ताद साळवे यांच्या पुण्यतिथी निमित्त फकीरा पॅंथर सेना, भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा यांचे वतीने लहुजी वस्ताद साळवे यांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून खानापूर विधानसभा मतदारसंघाचे गोरगरिबांचे लोकप्रिय नेते सांगली जिल्हा समाज कल्याण सभापती मा. ब्रह्मानंद पडळकर साहेब फकीरा पॅंथर सेनेचे संस्थापक अध्यक्ष तथा भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष संदीप तात्या ठोंबरे,खानापूर तालुक्याचे कर्तव्यदक्ष तहसीलदार योगेश टोम्पे साहेब, भारतीय जनता पार्टी सांगली जिल्हा सचिव पंकज भैय्या दबडे, भारतीय जनता पार्टी ज्योतिष आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आचार्य संतोष यादव, राष्ट्रीय संविधान सन्मान पुरस्कार प्राप्त मराठा आरक्षण संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम नाना जाधव साहेब ,सांगली जिल्हा सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष दाजी भाऊ पवार खानापूर तालुका अध्यक्ष एडवोकेट प्रमोद दादा भारते, फकीरा पॅंथर सेनेचे महाराष्ट्र प्रदेश समन्वयक सुभाष लांडगे साहेब, प्रदेश कार्यकारणी सदस्य राहुल सकट, दलित महासंघ प्रदेशाध्यक्ष (जे के बापू गट) वीरसेन दादा कांबळे, वाळवा तालुका अध्यक्ष महेश घस्ते, कडेगाव तालुकाध्यक्ष वसंतराव तुपे सांगली जिल्हा उपाध्यक्ष मेजर महेंद्र लोंढे, खानापूर शहराध्यक्ष लाला ठोंबरे खानापूर तालुका विभाग प्रमुख संतोष सकट, पप्पू तुपे ,विटा शहराध्यक्ष मुकेश पंडित, आदी मान्यवरांच्या उपस्थितीत क्रांतीसुर्य लहुजी वस्ताद साळवे यांना अभिवादन करण्यात येणार आहे.

 तरी या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे

स्थळ - फकीरा पॅंथर सेनेचे मुख्यालय. " फकीरागड " किस्मत बिल्डिंग खानापूर रोड विटा तालुका खानापूर जिल्हा सांगली

दि.१७/२/२०२५

सकाळी ११ वाजता

निमंत्रक- मास्टर सयाजी सकट पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष फकीरा पॅंथर सेना

To Top