प्रकृतीची शुद्धता व मानवतेच्या उत्थानाच्या दिशेने निरंकारी मिशनचे एक स्वर्णिम पाऊल
सांगली जिल्हा परिक्षेत्रामध्ये १८ ठिकाणी राबविले ‘स्वच्छ जल - स्वच्छ मन’ अभियान:पाणी प्रकृतीचा अमूल्य उपहार, त्याचे संरक्षण ही आपली सर्वांची जबाबदारी
निरंकारी सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज
आटपाडी kd24news :दिल्ली, 23 फेब्रुवारी, 2025:- परम वंदनीय सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज व सत्कारयोग्य आदरणीय निरंकारी राजपिता रमितजी यांच्या पावन आशीर्वादाने 23 फेब्रुवारी 2025 ची स्वर्णिम प्रभात एक नवीन जागृती व सेवेच्या दिव्य प्रकाशाचा संदेश घेऊन आली ज्यामध्ये ‘अमृत प्रोजेक्ट’ अंतर्गत ‘स्वच्छ जल, स्वच्छ मन’ अभियानाच्या तिसऱ्या टप्प्याचे आयोजन विश्वभरात केले गेले आणि त्याबरोबरच दिल्लीतील निरंकारी मिशनच्या ग्राउंड नं 8 येथे एक विशाल सत्संग कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या अभियाना अंतर्गत सांगली जिल्हा परिक्षेत्रातील सांगली सेक्टर अंतर्गत सांगली येथील कृष्णा नदीच्या तिरी असलेला स्वामी समर्थ घाट,मिरज व नरवाड कृष्णा घाट,जत नगरपरिषद पाण्याची टाकी तसेच बिरनाळ तलाव जवळील पाणीपुरवठा करणारी विहीर परीसर,सलगरे म्हैशाळ कालवा टप्पा क्र ५ देशिंग पाणीपुरवठा करणारी विहीर ,खानापूर सेक्टर अंतर्गत खानापूर येथील पापनाशी ओढा,कडेगाव नगर पंचायतीला पाणीपुरवठा करणारा तलाव , तासगाव येरळा नदी परीसर, बिरणवाडी व सावळज अंजनी तलाव, आटपाडी स्वतंत्रपुर तलाव तसेच विटा नेवरी पुसेसावळी मायणी यांनी संयुक्त रित्या येरळा नदीवरील इरिगेशन पाँईंट , इत्यादी ठिकाणी वाळवा सेक्टर अंतर्गत वाळवा येथील रामलिंग बेट बहे ,पलुस येथील कृष्णा नदी घाट धनगाव तसेच शिराळा वारणा नदी काट सागाव इत्यादी जिल्ह्याच्या एकुण १८ ठिकाणी जलस्रोतांची स्वच्छता करण्यात आली ज्यामध्ये सुमारे शेकडोंच्या संख्येने निरंकारी सेवादल स्वयंसेवक व भाविक भक्तगणांनी मोठ्या उत्साहाने भाग घेतला.यावेळी स्थानिक अधिकारी गण व पदाधिकारी यांनी सदर ठिकाणी भेट देऊन या निस्वार्थी भावनेने राबविलेल्या अभियानाचे कौतुक केले व आभार मानले.
संत निरंकारी मंडळाचे सचिव व समाज कल्याण प्रभारी श्री.जोगिंदर सुखीजा यांनी माहिती देताना सांगितले, ही मोहीम केवळ एका दिवसापुरती सीमित नाही तर दरमहा विविध घाट व जलस्रोतांची स्वच्छता निरंतर चालू राहील. 27 राज्ये व केंद्रशासित प्रदेशातील 1650 पेक्षा अधिक ठिकाणी 10 लाखांहून अधिक संख्येने सेवाभावनेने ओतप्रोत स्वयंसेवक भक्तगणांनी एकाच वेळी हे महान अभियान साकारले.
सतगुरु माताजींनी पाण्याच्या महत्व अधोरेखित करताना समजावले, की पाणी अमृतासमान आहे जे प्रकृतीने आपल्याला सर्वोत्तम उपहाराच्या रुपात प्रदान केले आहे. त्याची स्वच्छता आणि संरक्षण ही केवळ एक जबाबदारीच नव्हे तर आमची स्वाभाविक सवय बनून गेली पाहिजे याच चिंतनातून प्रेरित होऊन ‘प्रोजेक्ट अमृत’ सारख्या सामाजिक उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे जल संरक्षण आणि स्वच्छतेच्या प्रती जागरुकता पसरविण्याचा एक महत्वपुर्ण प्रयास आहे.
बाबा हरदेवसिंहजी यांच्या जन्मदिवसाला समर्पित असलेल्या या पवित्र सेवा अभियानात प्रत्येक भक्ताला जल संरक्षणाच्या दिशेने योगदान देण्याची संधी मिळाली.
पर्यावरण सुरक्षें अंतर्गत जल संरक्षणामध्ये आपली सकारात्मक सक्रिय भूमिका निभावत ग्लोबल एनर्जी ॲन्ड एन्व्हायरनमेंट फाउंडेशन (GEEF) ने संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनला (SNCF) प्रतिष्ठित ‘वाटर कंजर्वेशन इनिशिएटिव एनजीओ ऑफ द ईयर 2025’ पुरस्कार देऊन गौरविले आहे. नि:संशय जल संसाधनांची शुद्धता आणि सतत संरक्षण करण्यामध्ये SNCF द्वारे केले जाणारे प्रयास समाजाला स्वच्छ, स्वस्थ आणि समृद्ध भविष्याकडे अग्रेसर होण्यामध्ये महत्वपूर्ण भूमिका निभावत आहेत.