फकीरा पॅंथर सेनेच्या पलूस तालुका अध्यक्षपदी अशोक साठे यांची निवड
आटपाडी kd24news :दि. १४.पलूस....दलितांच्या वरील अन्याय अत्याचाराच्या विरोधात आक्रमक आणि जहालपने रस्त्यावर उतरून संघर्ष करणारी एकमेव संघटना म्हणून फकीरा पॅंथर सेनेचे नाव राज्यभरात घेतले जाते आज फकीरा पॅंथर सेनेच्या पलूस तालुका अध्यक्षपदी रामानंदनगर पलुस येथील आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते अशोक साठे यांची निवड फकीरा पॅंथर सेनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप तात्या ठोंबरे यांचे उपस्थितीत पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मास्टर सयाजी सकट तसेच राज्य कार्यकारिणी सदस्य राहुल सकट यांचे उपस्थितीत झालेल्या बैठकीत करण्यात आली.
यावेळी बोलताना फकीरा पॅंथर सेनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप तात्या ठोंबरे म्हणाले की फकीरा पॅंथर सेनेच्या माध्यमातून राज्यभरातील अनुसूचित जातीच्या छोट्या मोठ्या जात समूहांना एकत्रित करण्याचा माणूस ठेवून संघटना काम करत आहे हिंदू दलित समाजातील उपेक्षित वर्गांना सामाजिक न्यायाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून टोकाचा संघर्ष आणि लढा उभा केला आहे अनुसूचित जातीचे आरक्षण उपवर्गीकरण, साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न या सर्वोच्च नागरिक किताबाने गौरविण्यात यावे, मुंबई चिरागनगर येथील अण्णाभाऊ साठे यांचे राष्ट्रीय स्मारक याचे काम तात्काळ सुरू करावे, राष्ट्रवीर फकीरा रानोजी साठे यांचे राष्ट्रीय स्मारक शासनाने उभा करावे, लहुजी साळवे अभ्यास आयोगाच्या शिफारशीची अंमलबजावणी करावी यासह दलित समाजातील तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी त्यांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी फकीरा पॅंथर सेना काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.
निवडीनंतर बोलताना अशोक साठे म्हणाले की पलूस तालुक्यामधील प्रस्थापित राजकारणी गोरगरीब दिन दलितांना कधीच सामाजिक न्याय मिळू दिला नाही डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे, संत रोहिदास महाराज, क्रांतीसुर्य लहुजी साळवे यांच्या विचाराने येणाऱ्या काळात काम करणार असून फकीरा पॅंथर सेनेच्या माध्यमातून पलूस तालुक्यातील गावागावांमध्ये संघटन बांधणीसाठी पुढाकार घेणार असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी जेष्ठ नेते निशांत आवळेकर, गुरुनाथ दाभाडे ,मेजर संभाजी शिंदे, मुकेश पंडित, संदीप देवकुळे आदी मान्यवर उपस्थित होते.