Sanvad News ॲग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटणचा धर्मवीर छत्रपतीसंभाजी महाराज साहित्य सेवा पुरस्कार जेष्ठ साहित्यिक सुनील दबडे यांना जाहीर

ॲग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटणचा धर्मवीर छत्रपतीसंभाजी महाराज साहित्य सेवा पुरस्कार जेष्ठ साहित्यिक सुनील दबडे यांना जाहीर

Admin

ॲग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटणचा धर्मवीर छत्रपतीसंभाजी महाराज साहित्य सेवा पुरस्कार जेष्ठ साहित्यिक सुनील दबडे यांना जाहीर 


आटपाडी kd24news :ॲग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटणचा धर्मवीर छत्रपतीसंभाजी महाराज साहित्य सेवा पुरस्कार जेष्ठ साहित्यिक सुनील दबडे यांना जाहीर करण्यात आला आहे . ॲग्रोन्युज परिवाराचे प्रा . विजय काकडे आणि प्रकाश सस्ते यांनी ही माहिती पत्राव्दारे दबडे यांना कळविली आहे .

    फलटण येथील नवलबाई मंगल कार्यालयात २७ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनात दबडे यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे .

   सुनील दबडे यांच्या ' बनगी आणि बिरमुटं ' . या कथासंग्रहाला हा पुरस्कार जाहीर झाला आहे . विटा येथील ग्रामीण साहित्य संमेलनात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पूर्वाध्यक्ष श्रीपाल सबनीस यांच्याहस्ते या कथासंग्रहाचे प्रकाशन झाले होते . माडगुळे येथील शिदोरी साहित्य संमेलनात या कथासंग्रहावर नुकताच रंगतदार परिसंवादही झाला आहे . या कथासंग्रहाची पाठराखण महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध वक्ते आणि विचारवंत इंद्रजीत देशमुख ( काकाजी ) यांनी केली आहे . बदलत्या माणदेशाचे प्रभावी चित्रण या कथासंग्रहातून करण्यात आले आहे . या कथासंग्रहाला वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे . 

     सुनील दबडे यांची यापूर्वी चार पुस्तके प्रसिद्ध झाली असून त्यांना राज्यातील अनेक प्रतिष्ठेच्या साहित्य व सेवा सन्मान पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे . राज्यभर विविध विषयांवर त्यांनी शेकडो व्याख्याने दिली आहेत . अनेक शैक्षणिक व साहित्यिक उपक्रमांचे त्यांनी यापूर्वी आयोजन केले आहे . शासनामार्फत राबविण्यात आलेल्या अनेक ठिकाणच्या परिचर्चेत त्यांनी अनेकवेळा सहभाग घेतला आहे . नवोदित कवी व लेखकांना अनेक लेखनाच्या कार्यशाळांतून त्यांनी मार्गदर्शन केले आहे . आकाशवाणीच्या विविध केंद्रावरून तसेच टिव्ही ९ या मराठी चॅनेल वरून त्यांचे साहित्यिक कार्यक्रम प्रसारित झाले आहेत . त्यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल त्यांचे विविध क्षेत्रांतल्या मान्यवरांनी अभिनंदन केले आहे .

To Top