संत गाडगेबाबा जयंती दिनी गोरे व आदलिंगे यांचासत्यशोधक विवाह घडला, तो आदर्श सर्व समाजाने घ्यावा –डॉ.निकिताताई देशमुख
फुले एज्युकेशन तर्फे सांगोल्यात 51 वा सत्यशोधक सोहळा संम्पन्न .
आटपाडी kd24news :सांगोला घेरडी . फुले शाहू आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फाऊंडेशन पुणे चे बहुउद्देशीय सत्यशोधक केंद्रातर्फे संत गाडगेबाबा महाराज जयंती दिनी रविवार दि.23 फेब्रुवारी 2025 रोजी दु.4.30 वाजता सांगोला परिसरातील पहिला सत्यशोधक विवाह सोहळा प्रगतशील शेतकरी शिवाजीराव गोरे ,घेरडी यांच्या (स्वगृही) सत्यशोधक जयराम गोरे, आणि समाजसेवक उद्दव आदलिंगे यांची सत्यशोधिका पुजा आदलिंगे, यांचा महात्मा फुले यांना अभिप्रेत असलेल्या पद्धतीने पुरोगामी विचाराचे स्व.डॉ.गणपतराव देशमुख यांच्या सुनबाई व आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या पत्नी डॉ.निकिताताई देशमुख यांचे व अनेक मान्यवरांचे उपस्थितीत शानदार पणे प्रबोधन करीत मोफत संपन्न झाला.
या प्रसंगी डॉ.निकिता देशमुख म्हणाले की आयुष्यभर जनजागृती करणारे लोकशिक्षणाचे चालते बोलते विद्यापीठ थोर संत गाडगेबाबा महाराज यांनी अंधश्रद्धा , कर्मकांड व विज्ञानावर आधारित जनजागृती केली. असे समाज प्रबोधन करणारे महान संताचे जयंती दिनी गोरे आदलिंगे परिवाराने हा सोहळा आयोजित करून हे सर्व पहाण्याची व सहभागी होण्याची संधी दिली त्याबद्दल परिवाराचे अभिनंदन करीत या तालुक्याचे आमदार बाबासाहेब देशमुख यांना याचा सार्थ अभिमान वाटतोय तर हा आदर्श सर्व समाजाने घ्यावा असे मौलिक विचार देखील मांडले.
या सोहळ्याचे विधिकर्ते म्हणून संस्थेचे अध्यक्ष व महात्मा फुले चरित्र साधने साहित्य व प्रकाशन समितीचे निमंत्रित सदस्य सत्यशोधक रघुनाथ ढोक हे नेहमी प्रमाणे महात्मा फुले यांच्या वेशभूषेत विधी कार्य पाडले तर राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सुदाम धाडगे यांनी महात्मा फुले रचित मंगलाष्टकेचे चे गायन केले . यावेळी वधू वर यांना सत्यशोधक विवाह प्रमाणपत्र आणि थोर समाज सुधारक महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांची फोटो फ्रेम डॉ.निकिताताई देशमुख ,बाळासाहेब ननावरे ,सोमनाथ राऊत यांचे शुभहस्ते भेट देण्यात आले . तसेच वधू वर यांचे आई वडील व मामा मामी यांना व निवेदिका सौ.मयुरी राऊत व विवाह सोहळा घडवून आणणरे सोमनाथ राऊत यांना राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे वतीने सन्मान पत्र देण्यात आले. या प्रसंगी वर्षाराणी गोरे यांनी Phd पूर्ण केली तसेच अश्विनी ,मनीषा ज्योती गोरे व सावित्री बोराडे यांनी पदव्युत्तर उच्च शिक्षण घेतले म्हणून यांचा फेटा बांधून शाल श्रीफळ व सन्मानपत्र देऊन डॉ.निकिता देशमुख यांचे हस्ते येथोचीत सन्मान केला तर हा सोहळा पाहून मनीषा ,अश्विनी ,ज्योती व सावित्री या उच्चशिक्षित मुलीनी आम्ही सत्यशोधक जीवनसाथी निवडून याच पद्धतीने विवाह करू असे सर्वासमक्ष मनोगत व्यक्त केल्याने या सोहळ्याची चांगलीच चर्चा परिसरात रंगली होती. राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज्य मंत्री व सोलापूरचे पालक मंत्री मा.ना.जयकुमार गोरे यांनी फोन वरून व आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख आणि सोलापूरचे माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांनी या सत्यशोधक विवाह सोहळ्यासाठी शुभ संदेश व शुभ आशीर्वाद आवर्जून दिले.