Sanvad News आटपाडी तहसील कार्यालय मार्फत 17, 18 व 19 मार्च रोजी विशेष जात प्रमाणपत्र शिबिर

आटपाडी तहसील कार्यालय मार्फत 17, 18 व 19 मार्च रोजी विशेष जात प्रमाणपत्र शिबिर

Admin

 आटपाडी तहसील कार्यालय मार्फत 17, 18 व 19 मार्च रोजी विशेष जात प्रमाणपत्र शिबिर


अभिलेख कक्ष (रेकॉर्ड रूम) 15 व 16 मार्च सुट्टी च्या दिवशी ही चालू 

आटपाडी kd24news: आटपाडी तहसील कार्यालय,येथे विशेष जात प्रमाणपत्र शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.त्यासाठी तालुक्यातील समाज घातकातील मांग, गारुडी, रामोशी, नंदीवाले, कुणबी, मरीआई, मदारी, वडर, महार(नोंद उपलब्ध असल्यास) या समाजघटकांतील पात्र लाभार्थ्यांना जात प्रमाणपत्र प्रदान करण्याच्या उद्देशाने, तहसील कार्यालय, आटपाडी यांचेमार्फत दि. 17, 18 व 19 मार्च 2025 (सोमवार, मंगळवार व बुधवार) या कालावधीत विशेष जात प्रमाणपत्र शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

       सदर शिबिरामध्ये लाभार्थ्यांनी जात प्रमाणपत्रासाठी आवश्यक असलेली महसूल अभिलेखे जसे की उत्पत्ती दाखले, वंशवृक्ष, फेरफार नोंदी, ७/१२ उतारे, नामेनोंदी इत्यादी कागदपत्रे विहित नमुन्यात देणे आवश्यक आहे.

      वरील कागदपत्रे वेळेत उपलब्ध व्हावी, यासाठी दि. 15 व 16 मार्च 2025 (शनिवार व रविवार)रोजी तहसील कार्यालय, आटपाडी येथील अभिलेख कक्ष (रेकॉर्ड रूम) कार्यान्वित (चालू) ठेवण्यात येणार आहे.

      तरी,वरील प्रवर्गातील इच्छुक लाभार्थ्यांनी या विहित तारखांना अभिलेख कक्षात उपस्थित राहून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी,जेणेकरून शिबिरादरम्यान जात प्रमाणपत्र वितरणाची कार्यवाही नियोजित व सुयोग्य पद्धतीने पार पाडता येईल.

       या बरोबर जात प्रमाणपत्र अर्जासोबत संबंधित मूळ कागदपत्रे तसेच त्यांच्या सत्यप्रती सादर करणे बंधन कारक आहे.असे आटपाडी तहसीलदार सागर ढवळे यांचे कडून सांगण्यात आले आहे.

To Top