Sanvad News राजगुरूनगरच्या अश्विनी राजेंद्र पाचारणे यांना "सहकार रत्न" पुरस्कार

राजगुरूनगरच्या अश्विनी राजेंद्र पाचारणे यांना "सहकार रत्न" पुरस्कार

Admin

 राजगुरूनगरच्या अश्विनी राजेंद्र पाचारणे यांना "सहकार रत्न" पुरस्कार



आटपाडी kd24news :प्रतिनिधि स्नेहा उत्तम मडावी पुणे: खेड येथील राजगुरुनगर सहकारी बँकेच्या संचालक तसेच शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या पुणे जिल्हाध्यक्ष अश्विनी राजेंद्र पाचारणे यांना नुकताच इचलकरंजी येथील पोलीस मित्र असोसिएशन व वेध फाऊंडेशनच्या वतीने सहकार रत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार रविवार दि ९ मार्च २०२५ रोजी महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या शुभहस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे. अश्विनी राजेंद्र पाचारणे यांचे महिलांच्या सबलीकरणासाठी मोठे योगदान आहे. सामाजिक सांस्कृतिक साहित्यिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य आहे. समाजाच्या उन्नतीसाठी अश्विनीताई सतत कार्यरत असतात तरूणांना उद्योग व्यवसायासाठी मदत करीत असतात. महिला बचतगटाच्या माध्यमातून महिलांच्या हाताला देवून त्यांचा संसार सुखाचा होण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करीत असतात. राजगुरुनगर सहकारी बँकेच्या माध्यमातून अनेकांना कर्ज उपलब्ध करून देऊन त्यांचा व्यवसाय उभारणी साठी मदत करीत असतात. अश्विनीताई पाचारणे यांना जाहीर झालेल्या पुरस्काराचे सर्व थरांत कौतुक होत आहेत अनेकांच्या शुभेच्छा येत आहेत..

To Top