Sanvad News आटपाडीत भारत विरुद्ध न्यूझीलंड क्रिकेट फायनल सामन्याचा क्रिकेट प्रेमींनी मोठया डिजिटल स्क्रीनवर घेतला आनंद

आटपाडीत भारत विरुद्ध न्यूझीलंड क्रिकेट फायनल सामन्याचा क्रिकेट प्रेमींनी मोठया डिजिटल स्क्रीनवर घेतला आनंद

Admin

 आटपाडीत भारत विरुद्ध न्यूझीलंड क्रिकेट फायनल सामन्याचा क्रिकेट प्रेमींनी मोठया डिजिटल स्क्रीनवर घेतला आनंद 





 भारतीय संघाने चॅम्पियन ट्रॉफी २०२५ जिंकल्यानंतर नंतर चौकात जोरदार फटाक्याची अतिषबाजी व हलगीच्या निनादात विजयाचा आनंद साजरा



आटपाडी kd24news :आटपाडी शहरांमध्ये पृथ्वीराज पाटील युवा प्रतिष्ठान यांच्या आयोजित भारत विरुद्ध न्यूझीलंड क्रिकेट फायनल मॅच चे आयोजन आण्णा भाऊ साठे चौक येथे भव्य डिजिटल स्क्रीन वर सामन्याचे थेट प्रकशेपण करण्यात आले होते.

 या प्रसंगी आटपाडी शहरासह तालुक्यातील हजारो क्रिकेट प्रेमींनी फायनल क्रिकेट सामन्याचा आनंद घेतला.

युवा नेते पृथ्वीराज पाटील व त्यांच्या सहकारी यांनी आटपाडी मध्ये प्रथमच भव्य स्क्रीनचे आयोजन करुन पुणे,मुंबई सारख्या शिटीचे स्वरूप आणले होते.या संकल्पनेने क्रिकेट प्रेमिंचा आनंद दुगुणित केला त्या बद्दल क्रिकेट प्रेमीनी त्याचे कौतुक केले.

       यावेळी उपस्थित क्रिकेट प्रेमींसोबत क्रिकेटचा आनंद घेताना आटपाडी तालुक्याचे नेते मा.श्री.तानाजीराव पाटील (अध्यक्ष) शिवसेना तालुकाप्रमुख श्री साहेबराव पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री संतोष भाऊ पुजारी,ग्रामपंचायत सदस्य शहाजी जाधव आटपाडी तालुक्याचे युवा नेते श्री पृथ्वीराज पाटील मालक व उपस्थित सर्व क्रिकेटप्रेमीनी फायनल मॅच चा आनंद घेतला.

              सर्व क्रिकेट प्रेमींनी भारतीय संघाने चॅम्पियन ट्रॉफी २०२५ जिंकल्यानंतर डॉ. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक येथे फटाक्याची आतिषबाजी व हलगीच्या निनादात विजयचा आनंद साजरा केला.

व्हिडिओ पहा :






To Top