Sanvad News पोलीस मित्र संघटनेच्या सभासदांना पोलीस भरती मध्ये प्राधान्य मिळावे .तसेच महाराष्ट्र शासनाने पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांची ड्युटी आठ तासाची करावी .पांडुरंग हातेकर

पोलीस मित्र संघटनेच्या सभासदांना पोलीस भरती मध्ये प्राधान्य मिळावे .तसेच महाराष्ट्र शासनाने पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांची ड्युटी आठ तासाची करावी .पांडुरंग हातेकर

Admin

  पोलीस मित्र संघटनेच्या सभासदांना पोलीस भरती मध्ये प्राधान्य मिळावे तसेच महाराष्ट्र शासनाने पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांची ड्युटी आठ तासाची करावी :पांडुरंग हातेकर 

पोलीस कॉन्स्टेबल निरंजन शिंदे हवालदार श्रीशैल वळसंग यांना निवेदन देताना पोलीस मित्र संघटनेचे पदाधिका

   आटपाडी kd24news :दिनांक 11/3/25.महाराष्ट्र शासनाने पोलीस मित्र संघटनेच्या सभासदांना शिक्षण पात्रतेनुसार पोलीस भरतीसाठी प्राधान्य मिळावे व महाराष्ट्र शासनाने पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांची ड्युटी आठ तासाची करावी अशी मागणी जत तालुका पोलीस मित्र संघटनेच्या वतीने पोलीस निरीक्षक जत यांच्याकडे पोलीस मित्र संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष पांडुरंग हातेकर यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे निवेदनात म्हटले आहे की पोलीस मित्र संघटना गेले 13 ते 14 वर्षापासून महाराष्ट्र राज्यामध्ये काम करत असून संघटनेत अनेक होतकरू सुरक्षित बेकार तरुण-तरुणी असून ते वेळोवेळी पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून काम करत असतात. तसेच सामाजिक कार्याची आवड असल्यामुळे वेळोवेळी प्रशासनाच्या कार्याचे योजनेची माहिती ग्रामीण विभागांमध्ये पोहोचवण्याचे काम करतात तसेच जे पोलीस अधिकारी व कर्मचारी बांधव आहेत यांना आठ तासाची ड्युटी करण्यात यावी अशी मागणी जत पोलीस मित्र संघटना यांच्या वतीने करण्यात आली यावेळी उपस्थित जिल्हा उपाध्यक्ष पांडुरंग हातेकर जिल्हा सचिव डॉक्टर तानाजी साळुंखे जनसंपर्कप्रमुख जत रवींद्र कुमार बामणे, तसेच सर्व महिला आघाडी उपस्थित होत्या.

To Top