करगणी श्री लखमेश्वर देवाची महाशिवरात्री खिलार जनावरांच्या यात्रेत चार कोटीची उलाढाल :पशु प्रदर्शनाने यात्रेची सांगता
आटपाडी kd24news : करगणी श्री लखमेश्वर देवाची जनावरांची यात्रा सालाबाद प्रमाणे करगणी ग्रामपंचायत कार्यालया समोरील जागेत सोमवार दि. ०३/०३/२०२५ रोजी सकाळी ०९:३० वाजता खिलार जनावरांचे भव्य प्रदर्शन उत्साहात पार पडले.
शेळ्यामेंढ्या व जनावरांची यात्रा आज ३ मार्च रोजी कृषी प्रदर्शनाने सांगता करण्यात आली.करगणीच्या परिसरामध्ये कृषि उत्पन्न बाजार समिती आटपाडी व ग्रामपंचायत करगणी यांचे संयुक्त विद्यमानाने घेण्यात आली.
करगणी ता आटपाडी येथील खिलार जनावरांच्या यात्रेत सुमारे १५ हजाराहून अधिक जनावरांची आवक झाली.पाच दिवस चाललेल्या यात्रेत ४ कोटी पेक्षा अधिक उलाढाल झाली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. या यात्रेत महाराष्ट्र बरोबर अनेक राज्यामधील जातिवंत खिलार जनावरांची या भरवलेल्या यात्रेत मोठ्या प्रमाणावर आवक झाली होती.
प्रदर्शनासाठी कर्नाटक, आंध्रप्रदेश, पंढरपूर, सांगोला, जत, जालना, बीड, कर्जत, पुणे, राशन, चाळीसगांव, येवत, कराड, सातारा, माण, खटाव, म्हसवड, आटपाडीसह अन्य तालुक्यातील पशुपालकांनी जातिवंत खिलार गाय, बैल, खोंड, कपिला गाय, कपिला खोंड यांच्यासह प्रदर्शनात सहभाग घेतला होता.
जातिवंत खिलार जनावरांसाठी करगणी येथील बाजार प्रसिद्ध आहे. बाजारात शेती उपयोगी हत्यारे व अवजारे, जनावरांच्या साहित्याची व्यापारी मोठ्या प्रमाणावर दाखल झाले होते. यात्रेमध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती आटपाडी व ग्रामपंचायत करगणी यांच्या वतीने आरोग्य ,वीज, पाणी व अन्य सुविधा पुरविण्यात आल्या होत्या. आज सोमवार दि ३ मार्च गुरुवार रोजी पशु प्रदर्शनाने यात्रेची सांगता करण्यात आली.
सदर कार्यक्रमास बाजार समितीचे सभापती मा. पै. संतोष (भाऊ) पुजारी, उपसभापती मा. सुनिल सरक, ग्रामपंचायत सरपंच मा. सौ सुरेखा व्होनमाने, उपसरपंच साहेबराव पाटील, बाजार समितीचे संचालक मा. सुबराव पाटील, मा. राहुल गायकवाड, मा. माणिक गाढवे, मा. विठ्ठल गवळी, मा. सुनिल तळे, मा. दादासाहेब सरगर, मा. दादासाहेब हुबाले, सचिव श्री शशिकांत जाधव व सहाय्यक सचिव श्री नारायण ऐवळे, बाजार समिती कर्मचारी वृंद तसेच मा. तात्यासाहेब व्होनमाने, मा. धनाजी खिलारी, मा. कैलास देवडकर, ग्रामपंचायत सदस्य सर्वश्री मा. आण्णा सरगर, मा. मुद्दसर इनामदार, मा. बाळासोा कांबळे, मा. भरत मंडले, मा. नाथा सरगर, तसेच मा. समाधान ढोबळे, मा. उत्तम माने, मा. भारत पाटील, मा. वसंत विभूते, मा. विजय सरगर, मा. आबंदास सरगर, मा. अभय पुकळे, निखिल कोळेकर, मा. निलेश कांबळे व आजी माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य, विकास सोसायटीचे आजी माजी चेअरमन, व्हा.चेअरमन, सदस्य, करगणी परिसरातील शेतकरी, व्यापारी व ग्रामस्थ यांचे उपस्थित गाय पूजन करुन प्रदर्शनास सुरवात झाली. शेतक-यांनी आपली जनावरे यात्रेतील ऑफीस समोर आणली डॉ. कांबळे साहेब, डॉ. चव्हाण साहेब, डॉ. गाढवे साहेब, डॉ. के.ए. पाटील साहेब, डॉ. बाबर मॅडम, यांनी निरीक्षण करुन विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम, सन्मान चिन्ह देऊन पुरस्कृत करणेत आले. आले व पाच दिवस चालणाऱ्या यात्रेची सांगता कृषी प्रदर्शनाने करण्यात आली.