"आदर्श माता" माझी आई श्रीमती कुंदाताई शेळके
आटपाडी kd24newz:मा.व्हा.चेअरमन हुतात्मा किसन अहिर सह.साखर कारखाना लि.वाळवा.वयाच्या पंचविशीत लोकनेते दत्तादादा शेळके यांनी डाॅ. क्रांतीवीर नागनाथ अण्णांबरोबर स्वतःला सामाजिक कार्यात, शिक्षण व उद्योग समुहाच्या उभारणीत झोकून देताना अण्णांबरोबर स्वतः शेळके यांनी 20-25 वर्षे घरसंसार सोडून शाळेत मुक्काम ठोकला.मागची कुटुंबाची,सर्व भावंडाची जबाबदारी स्वातंत्र्य पुर्व काळापासून क्रांतीवीर नागनाथ अण्णांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेले.
जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी खंडुदाजी शेळके , उत्तम संघटक व अत्यंत कडक स्वभावाच्या सर्वांची आजी तानुबाई शेळके यांच्या कडक शिस्तीत माझ्या आईने सांभाळली, आम्हा भावंडावर चांगले संस्कार केले,सर्व मुलांना समाजातील चांगले जबाबदार नागरिक म्हणून घडविले...
मोठी बहीण सौ.उज्ज्वला अधिकराव मोरे नगरसेविका व मा.सभापती महिला,बालकल्याण पलूस नगरपरिषद,भाऊ श्री.चंद्रशेखर शेळके उपसरपंच ग्रामपंचायत वाळवा, श्री.नंदकुमार शेळके उपाध्यक्ष जिल्हा काँग्रेस कमिटी सांगली,लहान बहीण सौ.उर्मिला विनोदराव बोराडे सलग 15 वर्षे नगरसेविका सेलू नगरपरिषद जि.परभणी या बरोबर सर्व भावंडे व सामाजिक क्षेत्रातील अनेक जबाबदाऱ्या पार पाडत प्रामाणिकपणे काम करत आहोत. माझ्या पत्नी प्रा.डाॅ.पुनम नंदकुमार शेळके यांना लग्नानंतर बीए एमए बीएड पीएचडी पर्यंत शिक्षण पूर्ण करताना आईनेही प्रोत्साहन दिले. आई ही सुशिक्षित होती, जुनी मॅट्रिक पास होती. श्रीमती कुसुमताई नायकवडी(माई)बरोबर तिलाही नोकरी करता आली असती पण तिने कुटुंबाची जबाबदारी स्विकारली. आमच्या कुटुंबाच्या जडणघडणीत आईचे योगदान मोठे आहे. माझ्या आईस श्री 1008 पार्श्वनाथ जैन चॅरिटेबल ट्रस्ट समडोळी यांचेकडून व सांगली जिल्ह्य़ातील जेष्ठ नेत्या जयश्रीताई पाटील यांचेहस्ते "आदर्श माता" पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी व्यासपीठावर लठ्ठे एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन शांतीनाथ कांते(अण्णा),दक्षिण भारत जैन सभेचे महामंत्री शशिकांत राजोबा, विचारार्थ पतसंस्थेचे चेअरमन अजित बंडे,सन्मती संस्कार मंचचे सुरेश चौगुले,डाॅ.मगदुम ,डाॅ.आशा गाझे, श्रद्धा बेले, ट्रस्टचे प्रमुख नंदकुमार बेले व सांगली,सातारा,कोल्हापूर जिल्ह्यातील, विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.