Sanvad News बिहार बुद्धगया येथील महाबोधी विहार बौद्धांच्या ताब्यात द्या.

बिहार बुद्धगया येथील महाबोधी विहार बौद्धांच्या ताब्यात द्या.

Admin

बिहार बुद्धगया येथील महाबोधी विहार बौद्धांच्या ताब्यात द्या.


भारतीय बौद्ध महासभा, वंचित बहुजन आघाडी सहित सकल बौद्ध समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन.

आटपाडी kd24news :सांगली, दि ०५/०३/२०२५ भारतातील, ज्या त्या धर्माचे स्थळे ज्या त्या धर्मातील अनुयायांच्या तसेच धर्मगुरूंच्या ताब्यात आहेत व त्यांच्याकडून त्याचे देखभाल व संरक्षण होत आहे परंतु संपूर्ण विश्वाला शांतता व दुःखमुक्तीचा महान संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांना सम्यक संबोधित प्राप्त होणारे स्थळ म्हणजे बुद्धगया आणि या ठिकाणीच महाबोधी विहार आहे. जगातील संपूर्ण बौद्ध अनुयायांचे हे अतिशय पूज्य आणि पवित्र ठिकाण आहे परंतु या ठिकाणी इतर धर्मातील लोकांनी कब्जा केला असून बौद्ध धम्माच्या विसंगत कृत्य या ठिकाणी केले जात आहेत याकरता बुद्ध गया मंदिर अधिनियम 1949 अनुच्छेद 13 25 आणि 26 अंतर्गत आम्हाला न्याय मिळावा याकरता संपूर्ण देशभर महाबोधी विहार मुक्ती आंदोलन सुरू आहे. वर नमूद अनुच्छदांचा जाणीवपूर्वक संबंधित अधिकारी व व्यवस्थापक यांच्याकडून भंग होत असून बौद्ध अनुयायांच्या भावना दुखवण्याचे काम होत आहे. तरी आमच्या या रास्त मागणीचा विचार होऊन महाबोधि विहार याचा ताबा बौद्धांकडे द्यावा अन्यथा भारतासहित पूर्ण जगामध्ये संतापाची लाट पसरेल व याची झळ येथील सामाजिक व्यवस्था अर्थव्यवस्था याला लागेल व त्याचे संपूर्ण जबाबदारी या देशाचे पंतप्रधान गृहमंत्री तसेच बिहार राज्याचे मुख्यमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ याचे असेल अशा आशियाचे निवेदन जिल्हाधिकारी सांगली यांच्यातर्फे मुख्यमंत्री विहार राष्ट्रपती भारत सरकार प्रधानमंत्री भारत सरकार यांना देण्यात आलेले आहे यावेळी भारतीय बौद्ध महासभा सांगली जिल्हा अध्यक्ष रुपेश तामगावकर संजय कांबळे, विशाल कांबळे, वंचित बहुजन आघाडीचे सांगली शहराध्यक्ष विनायक मोरे, जितेंद्र कोलप, कमलताई खांडेकर, उल्काताई तामगांवकर, अलका वाघमारे, प्रशांत वाघमारे, संजय भुपाल कांबळे, योगेश कुरणे, मनोज संदेश, शंकर माने, सुनिल खांडेकर, बाळासो वाघमारे, विद्याधर कांबळे, विजय मोटे, हिरामण भगत, शिलाराणी कांबळे,जयश्री लोखंडे, शर्मिली तासगावकर, सुनिता डावरे, संजीवनी कांबळे, युवराज कांबळे यांच्यासह मोठ्या संख्येने बौद्ध बांधव उपस्थित होते.

To Top