शासन मान्य दिव्यांग कर्मचारी संघटनेचा विभागीय मेळावा होणार शेगावला
आटपाडी kd24newz:शासन मान्यता प्राप्त महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटना मुंबई 32 या संघटनेच्या अमरावती विभागाचा विभागीय मेळावा मंगळवार दिनांक 1 एप्रिल 2025 रोजी दुपारी 2.00 वाजता संत नगरी शेगांव येथील शासकीय विश्रामगृह गृह येथे आयोजित करण्यात आला आहे.
या विभागीय मेळाव्यास संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा.तात्यासाहेब घाडगे पाटील साहेब, संघटनेचे मार्गदर्शक व शिल्पकार राज्यसचिव मा.श्री.परेश्वर बाबर, राज्याध्यक्ष मा.श्री.रविंद्र लोटन पाटील यांचे अध्यक्षते खाली होणार आहे. राज्य पदाधिकारी मा.श्री.साईनाथ पवार इत्यादी राज्य पदाधिकारी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
सदर मेळाव्यामध्ये जिल्ह्यातील कार्यकारिणी विषयी चर्चा करणे, अधिकारी कर्मचारी पदोन्नती व बदली या समस्या विषयी चर्चा करणे, दिव्यांग कर्मचारी यांच्या समस्या व अडचणी विषयी चर्चा, संघटना बांधणी साठी चर्चा,मागिल कामकाज आढावा घेणे, व वेळेवर येणार इत्यादी विषयांवर आढावा घेतल्या जाणार आहेत.
तरी अमरावती विभागातील अमरावती,अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम येथील सर्व संघटना चे पदाधिकारी तसेच सर्व अधिकारी कर्मचारी सभासद बंधु भगिनी यांनी उपस्थिती रहावे असे आव्हान संघटनेच्या वतीने करण्यात आलेले आहे. अशी माहिती संघटनेचे अमरावती जिल्हा अध्यक्ष राजेंद्र दिक्षित जिल्हा सचिव किशोर मालोकार व बुलढाणा चे जिल्हा सचिव किशन केणे मानेगांवकर यांनी दिली आहे*.