Sanvad News आटपाडीतील जॅग्वार सिटी येथे बटरफ्लाय गार्डन चा शुभारंभ

आटपाडीतील जॅग्वार सिटी येथे बटरफ्लाय गार्डन चा शुभारंभ

Admin

 आटपाडीतील जॅग्वार सिटी येथे बटरफ्लाय गार्डन चा शुभारंभ 



आटपाडी kd24news :आटपाडी येथील जॅग्वार सिटी येथे बटरफ्लाय गार्डनच्या कामाचा शुभारंभ आटपाडी नगरपंचायत चे मुख्याधिकारी वैभव हजारे यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी आटपाडी तालुक्यातील विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.



यावेळी मा.श्री.अमरसिंह  देशमुख (बापूसाहेब) माजी अध्यक्ष जि. प. सांगली, भगवान (आप्पा)मोरे, दिग्विजय देशमुख(जयदादा)बळवंतराव मोरे, बाळासाहेब पाटील, एडवोकेट चेतन जाधव, पांढरीनाथ नागणे,भाऊसाहेब गायकवाड, अरुण मुढे, ऋषिकेश देशमुख, दादासो पाटील, अमोल काटकर, सौ सुमन नागणे, भाऊसो भोसले, विठ्ठल बाड, दादासो मरगळे, बापूसो विभुते, महेश देशमुख, अरुण बालटे, विजय पाटील,अविनाश रणदिवे,प्रवीण क्षीरसागर, व व शिवजल ग्रुपचे सचिन भोसले नितीन जाधव रितेश सावंत आणि राहुल देशमुख व आदी मान्यवर यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.



 या बटरफ्लाय गार्डन हे केंद्र शासनाच्या सन २०२२-२३ मधील भांडवली गुंतवणुकी करता राज्यांना विशेष सहाय्य योजनेअंतर्गत राज्य शासनास प्राप्त अर्थ सहाय्यमधून ४ कोठी ८ लाख रुपये निधी उपलब्ध झाला असून योजने द्वारे आटपाडी नगरपंचायत हद्दीमधील जाग्वार सिटी या ठिकाणी बटर फ्लाय गार्डन व पोहोच रस्ते विकसित करण्यात येणार आहेत. जवळपास २. ५ एकर क्षेत्रामध्ये वरील गार्डन विकसित करण्यात येणार आहे. या मध्ये प्रवेश प्लाझा,सुरक्षा दालन (सुक्युरिटी केबिन), बसण्याची जागा (सिटींग पवेलीयन) ,अॅम्पीथेअटर,पदपथ रस्ता (वॉकवे) , बघण्याची जागा (Viewing Deck), कुंपण असलेली भिंत (कम्पाऊड बॉल विच फेन्स) बांधणे अशी कामे या निधीतून होणार आहेत.



हे बटरफ्लाय गार्डन सात ते आठ महिन्यात होणार असुन ते पुणे-मुंबई सारख्या गार्डन सारख्या अनुभवाची प्रचिती या गार्डन मधून आटपाडी तालुक्यातील सर्व नागरिकांना अनुभवता येणार आहे.त्यामुळे आटपाडी तालुक्याच्या सौंदर्यामध्ये या गार्डन च्या माध्यमातून भर पडणार आहे.  

 

 

              या शुभारंभ प्रसंगी अमरसिंह देशमुख यांनी संबंधित कॉन्ट्रॅक्टदार यांना चांगले व उत्कृष्ट दर्जेदार काम करुन लवकरात लवकर गार्डन पूर्ण करण्याच्या सूचना केल्या.

To Top