Sanvad News दिघंचीत उद्या कै.श्रीमंत बाबासाहेब देशमुख यांच्या जयंतीनिमित्त मोफत जिल्हास्तरीय आरोग्य महाशिबीर

दिघंचीत उद्या कै.श्रीमंत बाबासाहेब देशमुख यांच्या जयंतीनिमित्त मोफत जिल्हास्तरीय आरोग्य महाशिबीर

Admin

 दिघंचीत उद्या कै.श्रीमंत बाबासाहेब देशमुख यांच्या जयंतीनिमित्त मोफत जिल्हास्तरीय आरोग्य महाशिबीर


आटपाडी kd24news :आटपाडी तालुक्यातील दिघंची येथे उद्या १० मार्च रोजी श्रीमंत बाबासाहेब देशमुख यांच्या स्मृतिप्रित्यर्थ मोफत जिल्हास्तरीय आरोग्य महाशिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी करण्यात येणार आहे.या प्रसंगी अनेक रोगांचे निधान अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर्स उपस्थित होणार आहे. या शिबिरामध्ये मिरजेचे सिनर्जी हॉस्पिटल,पंढरपूरचे सुपर स्पेशालिटी, आटपाडीचे सुविधा हॉस्पिटल यांचा प्रामुख्याने सहभाग असणार आहे. रुग्णांनी या मोफत शिबिराचा लाभघ्यावा, असे आवाहन श्रीमंत बाबासाहेब देशमुख जयंती कमिटी मार्फत करण्यात आले आहे.

 हे शिबीर उद्या सोमवार १० मार्च रोजी सकाळी ०९ वा.पासून दुपारी ०४ पर्यंत चालणार आहे. जिल्हा परिषदेचे आरोग्य विभाग, जिल्हा परिषद आणि आटपाडी पंचायत समिती यांच्या स्वीय निधीमधून या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

      या महाशिबिरास जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक अधिकारी, गटविकास अधिकारी, आटपाडी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक, राजेंद्रअण्णा देशमुख, अमरसिंह देशमुख, हर्षवर्धन देशमुख यांचीही प्रमुख उपस्थिती असणार आहे. यावेळी दिघंचीसह आटपाडी तालुक्यातील करगणी, खरसुंडी, आटपाडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर उपस्थित राहणार आहेत.





To Top