विजयनगर ग्रामपंचायत येथील सभागृहास भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव ठरावानुसार घालण्यास ग्रांपचायतीचा व ग्रामसेवक यांचा विरोध
आटपाडी kd24newz:विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती १४ एप्रिल रोजी संपूर्ण देश विदेशात होत असते. गेली चार वर्षे झाली पाठपुरावा करूनही 'विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर' यांचे नाव घालण्यास, मिरज तालुक्यातील विजय नगर ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक आणि सरपंच हे जातीय दोषातून टाळाटाळ करीत आहेत.
मागासवर्गीय समाजमंदीरावरील सभागृहाचे बांधकाम करतेवेळी शासन निर्णयानुसार स्टॅक्चरल ऑडिट करणे तसेच बौद्ध समाजाचे समाज संस्कृती मंदिराचे बांधकाम असतानाही स्ट्रॅक्चरल ऑडिट न करता बेकायदेशीर काम चालू केले होते. त्यावेळी डॉ.बाबासाहेबाना मानणाऱ्या लोकांनी त्या कामाला विरोध केला होता. विरोध केल्यामुळे सभागृहास भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार 'भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर' नाव देतो म्हणून ग्रामपचायतीने ग्रामसभा ठराव दिला पण त्या ठरावानुसार नाव न देता जिन्याच्या वरच्या बाजूस देऊन अपमानकारक नाव दिले असल्यामुळे गावातील सर्व समाजातील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानणाऱ्या व सांगली जिल्ह्यातील आंबेडकरी समाजातील नागरिकांच्या तीव्र भावना दुखावल्या गेल्या आहेत. ग्रामसेवक यांच्याकडे ठरावानुसार नाव का दिले गेले नाही अशी विचारणा केली असता त्यांनी एक शासन निर्णय नागरिकास दिला व सांगितले की, या शासन निर्णयानुसार आम्हाला 'विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर' यांचे नाव देता येणार नाही. शासन निर्णयानुसार नाव देता येत नसेल तर त्यांनी या कामासाठी प्रस्ताव कसा दिला ? तो प्रस्ताव मंजूर होऊन कामासाठी निधी कसा मिळाला ? जर शासन निर्णयानुसार नाव देता येत नसेल तर हा निधी कसा मंजूर करण्यात आला?
ग्रामपंचायत विजयनगर येथील ग्रामसेवक 2008 पासून ते 2025 आजअखेर सेवेत एकाच ठिकाणी कार्यरत आहेत व सदरचे ग्रामसेवक बसवराज कुंभार हे कायम आंबेडकरी समाज्याच्या विरोधात भूमिका घेत असलेचे दिसून येत आहे. शासन निर्णयानुसार ग्रासेवकाची बदली तीन ते पाच वर्षानी बदली करणे बंधनकारक असतानाही वरिष्ठ आधिकाऱ्यांनी शासन निर्णयाचे पालन याठिकाणी केलेले दिसून येत नाही.'भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर' यांचे नाव शासन निर्णयानुसार घालता येत नाही म्हणणाऱ्या ग्रामसेवकांची त्यांनी त्याच्या कार्यकाळात केलेल्या कामाची चौकशी करण्यात यावी ती कामे त्यांनी शासन निर्णयानुसार किती केली याचीही चौकशी करण्यात यावी. व त्या ग्रामसेवकाची खातेनिहाय चौकशी करण्यात यावी.
ग्रामसभा ठरावानुसार सभागृहास 'भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर' यांचे नाव दर्शनी पश्चिमेस बाजूस देण्यात यावे अन्यथा दिं. ७ एप्रिल २०२५ पासून पंचायत समिती मिरज येथे 'आमरण उपोषण' करण्यात येईल याची नोंद घ्यावी. असा इशारा देण्यात आला आहे..यावेळी सांगली जिल्हाध्यक्ष महावीर तात्या कांबळे,जिल्हा सहप्रवक्ता अनिल सावंत,अशोक लोंढे उपाध्यक्ष,संजय कांबळे जिल्हा संघटक,अनिल मोरे जिल्हा महासचिव,वसंत खांडेकर,मिरज तालुका अध्यक्ष विशाल धेंडे, सागर आठवले महासचिव,प्रमोद मल्हाडे उपाध्यक्ष, परशराम कांबळे, सचिन कोलप, बहादूर कांबळे,प्रवीण कांबळे, नवीनकुमार कांबळे,बाळासो कोलप,तसेच गावातील महिला व पुरुष ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.